Pune Accident : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला, महामार्गावर रक्ताचा सडा; काय घडलं?

मुंबई तक

19 Jul 2024 (अपडेटेड: 19 Jul 2024, 05:42 PM)

Pune Accident News : गुळंचवाडी येथून अंत्यविधी उरकून काही मंडळी घरी निघाली होती. यावेळी नगरकडून येणारा भरधाव ट्रक थेट गर्दीत शिरला होता. या दरम्यान या ट्रकने अनेक चारचाकी आणि दुचाकीला धडक दिली.

pune accident speeding truck rushed into the funeral crowd three people dead and some injured gulanchwadi pune nagar kalyan highway

नगरकडून येणारा भरधाव ट्रक थेट गर्दीत शिरला होता.

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात

point

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकीस्वारांना चिरडलं

point

अंत्यविधीवरून माघारी परतणाऱ्या नागरिकांवरही ट्रक घातला

Pune Accident News : स्मिता शिंदे, जुन्नर : अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरीकांच्या गर्दीत भरधाव ट्रक घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते.  (pune accident speeding truck rushed into the funeral crowd three people dead and some injured gulanchwadi pune nagar kalyan highway)

हे वाचलं का?

गुळंचवाडी येथून अंत्यविधी उरकून काही मंडळी घरी निघाली होती. यावेळी नगरकडून येणारा भरधाव ट्रक थेट गर्दीत शिरला होता. या दरम्यान या ट्रकने अनेक चारचाकी आणि दुचाकीला धडक दिली. तरी देखील हा ट्रक थांबला नाही आणि थेट गर्दीत शिरला होता. विशेष म्हणजे जर या चारचाक्या आणि दुचाक्या समोर आल्या नसत्या तर त्याने अंत्यविधीतल्या गर्दीतल्या सर्वांना चिरूडून पळ काढला होता. 

हे ही वाचा : Pooja Khedkar: पूजा खेडकरांची IAS ची नोकरी जाणार? UPSC कडून गुन्हा दाखल

दरम्यान या अपघातात चारचाक्या गाड्या आणि दुचाक्या मध्ये आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींनी आळेफाटा आणि इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरीकांमधून रोष व्यक्त होतं आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनूसार,  भरधाव ट्रक हा सर्व गाड्या आणि माणसांना चिरडून निघून गेला. या घटनेमुळे सगळीकडे आणि माणसांचा सडा पडलेला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. तसेच या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने त्यांनी सांगितले आहे. दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनूसार, जर भरधाव ट्रक चालकाच्या मार्गात चारचाकी आणि दुचाकी आल्या नसत्या तर सगळ्यांना चिरडून निघाला असता. तसेच ट्रक चालकाने चारचाकी आणि दुचाकीला ठोकून सुद्धा तो थांबला नाही आणि थेट गर्दीत घुसला होता. आणि गर्दीपासून अजून अर्धा किलोमीटर लांब जाऊन थांबला होता. 

दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरीक चांगलेच आक्रमक झाले होते. नागरीकांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन केलं होतं. या घटनेने आता गावात हळहळ व्यक्त होतं आहे. 

    follow whatsapp