Pune Accident Update : आरोपीच्या आजोबाला ठोकल्या बेड्या; मोठा कट आला समोर

दिव्येश सिंह

25 May 2024 (अपडेटेड: 25 May 2024, 11:20 AM)

Pune Accident News Marathi : पुण्यातील पोर्श कार हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक केली आहे.

सुरेंद्र अग्रवाल, अल्पवयीन आरोपीचे आजोबा.

पुणे कार अपघातातील आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोर्श अपघात प्रकरण अपडेट

point

सुरेंद्र अग्रवाल याला अटक

point

चालकाला धमकावल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

Pune Accident Latest News : (ओमकार वाबळे, पुणे) पोर्श कार हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यालाही बेड्या ठोकल्या आहे. या अटकेचे कारणही समोर आले आहे. (Pune Police crime branch Arrested Juvenile accused grandfather Surendra Agarwal)

हे वाचलं का?

दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी एक अटक केली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आरोपानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

१८ मे रोजी मध्यरात्रीनंतर पुण्यातील कल्याणीनगर मध्ये पोर्श कारमधून जात असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या मुलाने दुचाकी उडवली. यात एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. या हिट अॅण्ड रन प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे.

पोर्श कार चालकाला धमकी

पोर्श कारचा अपघात झाला, त्यावेळी अल्पवयीन गाडी चालवत होता. पण, त्याच्या कुटुंबाकडून हा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी आता चालकावर दबाव टाकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कार चालक गंगाधर हेरीक्रूब यांनी येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे.

हेही वाचा >> पोर्श कार अपघात प्रकरणी 'त्या' पोलिसांवर प्रचंड मोठी कारवाई! 

त्यावरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल याला शनिवारी (२५ मे) सकाळी  अटक केली. 

गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकाला धमकी

येरवडा पोलीस ठाण्यात चालक गंगाधर हेरीक्रूब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ मे ते २० मे दरम्यान चालक गंगाधर हेरीक्रूब हे येरवडा पोलीस ठाण्यातून घरी जात होते. त्यावेळी सुरेंद्र अग्रवाल याने त्यांना बोलून घेतले.

हेही वाचा >> ठाकरेंचे दोन उमेदवार ठरले! शिवसेनेकडून (UBT) नावे जाहीर 

बीएमडब्ल्यू कारमध्ये बसवून ब्रह्मा सनसिटी येथील त्यांच्या बंगल्यात नेले. तिथे सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालक गंगाधर यांना धमकावले. मोबाईल काढून घेतला आणि बंगल्यात डांबून ठेवले. त्याचबरोबर अपघाताचा गुन्हा स्वतः घेण्यासाठी धमकी दिली. याबद्दल कुणाला बोललास तर याद राख अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटलेले आहे. 

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी चालकाला अडकवण्याचा कट

या प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी चालकाला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यानंतरही कार अल्पवयीन आरोपी चालवत नव्हता हे दाखवण्यासाठी चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आता कार चालकाला गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्नही समोर आले आहेत.

    follow whatsapp