Raj Thackeray Latest News : पिंपरी चिंचवड येथून परत येत असताना खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट झाला. मुंबईकडे येत असताना राज ठाकरेंना खालापूर टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग दिसली. त्यानंतर ठाकरेंनी टोल नाक्यावर जाऊन सगळी वाहने सोडायला सांगितली. इतकंच नाहीतर वाहन अडवायची नाहीत, असा दमही दिला.
ADVERTISEMENT
सातत्याने टोलचा मुद्द्यावर भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरेंच्या संतापाचा सामना खालापूर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना करावा लागला. वाहनांच्या प्रचंड लांब रांगा बघून राज ठाकरेंनी विना टोल वाहने सोडायला लावली आणि ट्रॅफिक संपेपर्यंत वाहन अडवायची नाही, असा सज्जड दमही दिला.
राज ठाकरे संतापले, काय घडलं?
पिंपरी चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर शेकडो गाड्या टोलवर पाच किलो मीटरच्या रांगेत बऱ्याच वेळेपासून ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या.
हेही वाचा >> “ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र होतील”, निकालाआधी शिंदेंच्या आमदाराचा दावा
ही गोष्ट मुंबईकडे येत असताना राज ठाकरे यांच्या निदर्शनास आली. ते टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या ॲम्बुलन्सला रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन टोलसाठी अडवण्यात आलेली वाहने सोडण्यास सांगितली.
…तर याद राखा -राज ठाकरे
यावेळी टोल नाक्यावरील प्रमुख कर्मचाऱ्याला राज ठाकरेंनी सुनावले. “पुन्हा बांबू लावलात ना, तर मी तुम्हाला बांबू लावेन. एक जरी गाडी अडवलीत तर याद राखा. माहितीये का कुठपर्यंत ट्रॅफिक आहे तो…”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर सर्व वाहने विना टोल सोडण्यात आली.
हेही वाचा >> 2019 ला ‘कट्यार पाठीत घुसली’, मग आम्ही 2022 मध्ये…”, फडणवीसांनी ठाकरेंना केलं लक्ष्य
राज ठाकरे सातत्याने टोल वसुलीच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी टोल नाके जाळण्याचा इशाराही सरकारला दिला होता. त्यानंतर सरकार आणि राज ठाकरेंमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाली होती. यात राज ठाकरेंच्या बऱ्याच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या.
ADVERTISEMENT