Rajouri Attack : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात ही घटना घडली आहे. (rajouri attack army vehicle attack by terrorist jammu kashmir)
ADVERTISEMENT
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर ताबडतोड गोळीबार केला होता. राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास वाहनांवर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
हे ही वाचा : निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीश ‘आऊट’, विधेयकाला संसदेची मंजूरी
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ट्रक आणि जिप्सीसह पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन जवान शहिद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT