Ram Mandir News: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम मंदिराच्या या कार्यक्रमामध्ये देशातील अनेक दिग्गजांनी सहभाग झाले होते. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात देणग्याही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तान कोणी आणि किती देणग्या दिल्या आहेत, त्याचीच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मात्र, राम मंदिर ट्रस्टला देणग्या दिल्यानंतर आता आयकरमधूनही सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचीही इच्छा असेल तर तुम्हीही श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाईटला भेट देऊन राम मंदिराच्या उभारणीत हातभार लावू शकता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>‘PM मोदींनी रामासाठी उपवास केला, पण…’, उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
अंबानींकडूनही कोट्यवधींची देणगी
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळख असलेले मुकेश अंबानी यांनीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. अयोध्येतून निघताना त्यांनी राम मंदिरासाठी 2.51 कोटी रुपयांचीही देणगी दिली आहे. अंबानी कुटुंबाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगितले आहे की, अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या या श्रेष्ठ प्रयत्नाला सांस्कृतिकतेचे महत्त्व असल्यामुळे रामललासाठी आमच्याकडून ही एक छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
11 कोटींचा मुकुट
गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनीही अयोध्येतील राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीसाठी मुकुट दान केला आहे. हा मुकुट सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी घडवला आहे. त्या मुकुटाचे वजन 6 किलो असून त्या मुकुटाची किंमत 11 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. हा मुकुट रामललासाठी खास तयार करण्यात आला आहे. मुकेश पटेल हे सुरत येथील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक असून त्यांनी दान केलेला मुकुट सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.
सोन्याची रास
सुरतमधील आणखी एक सोने आणि हिऱ्याचे व्यापारी दिलीप कुमार यांनीही राम मंदिरासाठी 101 किलो सोन्याची देणगी दिली आहे. सध्याच्या काळात या सोन्याची किंमत ही 68 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
रामकथाकारांचंही योगदान
राम मंदिरासाठी फक्त उद्योगपतींनीच देणगी दिली असे नाही तर अनेकांनी देणगीच्या स्वरुपात वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. देणगीबाबत माहिती देताना ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे की, प्रसिद्ध रामकथाकार मोरारी बापू यांच्याकडून रामललासाठी 18 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. मोरारी बापूंनी ही रक्कम राम मंदिराच्या उभारणीसाठी देश-विदेशातून जमा केल्याचे सांगितले.
Income Tax मध्ये सूट
राम मंदिराच्या देणगीविषयी माहिती देताना रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटनुसार सांगण्यात आले आहे की, केंद्र सरकारने रामजन्मभूमीला ऐतिहासिक महत्त्व देत सार्वजनिक उपासनेचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून सूचित केले आहे. त्या अंतर्गत मंदिराला दिलेले 50 टक्के तुमच्या इच्छेनुसार दिलेली देणगी ही आयकरच्या कलम 80G (2)(B) नुसार पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कलम 80 G अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी, देणगीदाराला देणगीची पावतीही राखून ठेवावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT