Ranjit Savarkar book Make Sure Gandhi Is dead : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने (Nathuram Godse) झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे नथुराम गोडसेनी झाडलेल्या गोळ्यांमुळे महात्मा गांधी यांचा मृत्यू झालेला नाही, असा दावा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केला आहे. रणजित सावरकर यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (ranjit savarkar book make sure gandhi is dead gandhiji was not killed by nathuram godse bullet)
ADVERTISEMENT
रणजीत सावरकर यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन पार पडलं. या पुस्तकात रणजित सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत खळबळ माजवणारा दावा केला आहे. महात्मा गांधी यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या.महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेंच्या बंदुकीतून ज्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्याने महात्मा गांधीचा मृत्यू झालेला नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केला होता,
हे ही वाचा : Bihar Politics : शशी थरूर नितीश कुमारांना म्हणाले ‘स्नोलीगस्टर’, लोक शोधताहेत अर्थ?
पुस्तकात काय लिहलंय?
महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलेली नव्हती असा मोठा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.नथुरामांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही, असे पुस्तकात म्हटलं आहे.
त्यासोबत कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे 200 लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे माझं सरकारला आवाहन त्यांनी एक आयोग नेमावा आणि गांधींच्या हत्येचे पुरावे दडपण्यात आले आहेत, त्याची चौकशी सूरू करावी, अशी मागणी देखील रणजित सावरकर यांनी केली आहे.
ADVERTISEMENT