Man Died After Eating Ratol Tube : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूणमधून (Chiplun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दारू प्यायल्यानंतर चॉकलेट (chocalate) खाण्याची एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. मकसुद हाजम भाई ( 58) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मकसुद भाई यांना दारू प्यायल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय होती. मात्र दारूच्या नशेत त्यांनी चॉकलेट समजून रेटॉल ट्यूब खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने चिपळूण शहरात खळबळ माजली आहे. (ratnagiri news man dies drink alcohol after eat ratol tube instead of chocalate shocking story)
ADVERTISEMENT
चिपळूण शहरातील कावळीतळी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. याच दारूच्या व्यसनात चॉकलेट समजून थेट रेटॉल ट्यूब खाल्ल्याने एका 58 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मकसुद हाजम भाई (वय 58 वर्ष रा.काविळतळी ता.चिपळुण) असे मृत्यू झालेला इसमाचे नाव आहे.
हे ही वाचा : Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मकसुद यांना दारूचे व्यसन होते, दारू प्याल्यानंतर त्यांना चॉकलेट खाण्याचीही सवय होती. मात्र ही सवय त्यांच्या थेट जीवावरती बेतली आहे. चिपळूण शहरातील कावीळतळी परिसरात राहणारे मकसूद यांनी 5 नोव्हेंबर रोजी रात्री दारू पिल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय असल्याने रात्री त्यांनी चॉकलेट समजुन रेटॉल ट्यूब दारुच्या नशेत खाल्याने याचा त्रास त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी जोरदार होऊ लागला. 6 नोव्हेंबर रोजी त्यांना अस्वस्थ होऊ लागल्याने व उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ चिपळूण शहरातील एस.एम.एस. हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी ज्युपीटर हॉस्पिटल पुणे येथे हलविण्यात आले होते.
दरम्यान 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ज्युपीटर हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असताना विषारी पदार्थ सेवन केल्याप्रकरणी मकसूद यांचा मृत्यू झाला.या सगळ्या प्रकरणाची नोंद चिपळूण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT