Chhatrapati Shivaji Maharaj : धक्कादायक! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 9 महिन्यांपूर्वी PM मोदींनी केलेलं अनावरण

मुंबई तक

26 Aug 2024 (अपडेटेड: 26 Aug 2024, 06:30 PM)

Sindhudurg News : नौदल दिना निमित्त छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमीमधून नाराजी व्यक्त होत आहे.

sindhudurg news malvan rajkot fourt chhatrapati shivaji maharaj statue collapsed pm narendra modi inaugrate shocking story from malavan

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला

follow google news

बातम्या हायलाइट

point

मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

point

पंतप्रधान मोदींनी केले होते पुतळ्याते अनावरण

point

लोकापर्णानंतर 9 महिन्यातच पुतळा कोसळला

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 9 महिन्यांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण या अनावरण सोहळ्याला 9 महिने देखील उलटले नाही तोच पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पुतळ्याच्या दर्जावरून देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसंच या घटनेवरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. (sidhudurg news malvan rajkot fourt chhatrapati shivaji maharaj statue collapsed shocking story from malavan) 

हे वाचलं का?

गेल्या वर्षी  4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधील राजकोट किल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण केले होते. या अनावरणाला आता नऊ महिने उलटले आहेत. पण अवघ्या 9 महिन्यात शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामकाजाच्या निकृष्टतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावरून आता स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा : Gold Prices Today: सणासुदीला सोने खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री! आज 1 तोळा सोन्याचा भाव किती?

गेल्या सहा महिन्यापूर्वी मोदींच्या दौऱ्यावेळी हा पुतळा घाईगडबडीत बसवला होता. त्यावेळी स्थानिकांनी या पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र ते विरोधक आहेत म्हणून त्यांच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आणि आज पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडला. त्यामुळे सरकारच्या कामाचे आज वाभाडे निघाले आहेत, असे उबीटीचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. या प्रकरणी एफआयर दाखल झाली पाहिजे, जर प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने एफआयआर दाखल केला नाहीतर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. 

हे ही वाचा : THAR नव्हे, आनंद महिंद्रांनी थेट विमानच बनवलं, VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

महाराजांचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणार

दरम्यान या घटनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने महायुती सरकारवर टीका केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घाई घाईत मिंधे- भाजप सरकारने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक केवळ 8 महिन्यांत कोसळले. महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने महायुतीवर केली आहे. 

हा छत्रपती शिवरायांचा अवमान - सुप्रिया सुळे

देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. 

विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे,अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम कणकवली यांच्या कार्यालयाकडून सूमारे 5 कोटी रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुमारे 43 फुट उंच होता. जमिनीपासून बांधकाम 15 फूट आणि त्यावर 28 फुट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. 

    follow whatsapp