Mira Road: मुंबईजवळ असलेल्या मीरा रोडवर रविवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याठिकाणी उभारलेल्या बेकायदा दुकानांवरही बुलडोझर फिरवल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी रामभक्तांची मिरवणूक (Ram Bhakt) जात असताना या ठिकाणी जोरदार गोंधळ सुरु झाला. त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली होती. त्यानंतर हा तणाव मंगळवारपर्यंत कायम होता, त्यामुळे पोलिसांसह (Mumbai Police) प्रशासनही प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. या सगळ्यात मीरा रोडचा ट्रेंड आहे. कधी काळी या परिसरातील सगळी जमीन दलदलीची होती, त्यामुळे येथे अगदी दूरपर्यंत वस्ती नव्हती. ही परिस्थिती आहे 19 व्या शतकातील, त्यावेळी देशातील काही भाग हा ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, मात्र मीरा भाईंदर आणि वसईचा परिसर पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिला होता.(stones were pelted on ramlala procession mira road in discussion premises on the cry of ats)
ADVERTISEMENT
मीरा रोडची जमीन लीजवर
ब्रिटिशांनी 19 व्या शतकाच्या अखेरीस ही जमीन मुंबईतील रामचंद्र लक्ष्मणजी यांना भाडेतत्वावर दिली होती. त्यावेळी 999 वर्षाच्या लीजची अट त्यांना लावण्यात आली होती. तसेच रामचंद्र लक्ष्मण यांनी 6790 रुपये भाडे हे सरकारकडे भरावे असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यावेळी मीरा रोडच नाही तर या जमिनीबरोबरच घोडबंदर आणि भाईंदर परिसरातील साडेतीन हजार एकर जमिनीचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यावेळी त्या व्यापाऱ्यावर जमीन सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्व व्यवहाराची माहिती मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे.
शेतीसाठी चढाओढ
भारताच्या स्वातंत्र्यावेळी मीरा-भाईंदर हा ग्रामपंचायतीचाच एक भाग होता. 1985 मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिका स्थापन करण्यासाठी 5 ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करण्यात आले. नंतर त्यामध्ये आणखी 4 पंचायती जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे या क्षेत्राचा मोठा विस्तार झाला. या ठिकाणी असलेली पाण्याखालची जमीन ही त्याकाळी शेतीसाठी योग्य होती, व त्यावेळी वस्तीही कमी होती. त्याकाळात भातशेतीसाठीही जमीन खरेदी केली जात होती.
हे ही वाचा >> ‘सरकारने उपोषणाची वेळ आणू नये’, पाणावलेल्या डोळ्यांनी जरांगेंच्या पत्नीची सरकारला विनंती
सोयी सुविधा वाढल्या
1980 च्या दशकात मुंबईचा विस्तार होऊ लागल्यानंतर बिल्डर लोकांनीही या जमिनीमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. मुंबईतील गर्दीच्या गोंगाटाने कंटाळलेल्या लोकांना जमीन विकत घेऊन इथे राहायचे होते. त्यामुळे नंतरच्या काळात वीज, पाण्याची सोयीसुविधा वाढल्यानंतर येथील जमिनीमध्ये तेजी येण्यास सुरुवात झाली.
खारफुटीची वाढ
मुंबईतील सगळी वैशिष्ट्ये ही मीरा रोडमध्ये होती, आणि जागाही मोकळी होती. त्यामुळेच ग्लॅमर जगताशी निगडित लोकही येथे राहू लागले. चित्रपट आणि मालिकांचे शूटिंगचे सेट येथे तयार होऊ लागले. समुद्राला लागून असलेल्या या परिसरात खारफुटीची वाढ होत आहे. ही अशी झाडे आहेत जी खारट पाण्यामुळे मातीची धूप थांबवतात. त्यामुळे अनेकवेळा अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र महापालिकेने याबाबत कडक भूमिका घेतली. कारण येथून खारफुटी हटविल्यास मुंबईतील घरं, वस्त्या धोक्यात येण्याची शक्यता होती.
नया नगरची नवी माहिती
मीरा रोडची सुमारे 69 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. इस्लाम हा येथील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. त्यांच अनुयायी सुमारे 17 टक्के आहेत. ही माहिती 2011 च्या जनगणनेनुसार असली तरी त्यामध्ये आत्तापर्यंत खूप फरक पडला असण्याची शक्यता आहे. आता मीरा रोडच्या नया नगरबद्दल माहिती घेऊया कारण येथेच काही हिंसक घटना घडल्या आहेत.
एटीएसचे छापे
याबाबत आधीच इशारा देण्यात आला होता. डिसेंबरमध्ये, राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएसने या भागात छापा टाकून काही संशयितांना अटक केली होती. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून 40 हून अधिक संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.
ADVERTISEMENT