Nagpur Politics : १२ ऑक्टोबर २०२३ मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश समितीची विभागीय बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसमधील दोन गटात राडा झाला. पार एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या. आता या प्रकरणात काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून कारवाई करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे सचिव नरेंद्र जिचकार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जिचकार यांनी नागपूरमध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरू केलीये. यानिमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली असून, नाना पटोलेंविरुद्ध एक गट एकवटल्याचे दिसत आहे. नेमकं काय घडलंय, तेच समूजन घ्या…
ADVERTISEMENT
६ जानेवारी रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने जिचकार यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. १३ जानेवारी २०२४ रोजी नरेंद्र जिचकार यांनी पक्षाने केलेल्या कारवाईविरोधात मौन सोडलं. ‘पक्षाची हे पाऊल भाजपला फायदा करून देणारा आणि काँग्रेसची दुरावस्था करणारा आहे’, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> “पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत “, वंचित बहुजन आघाडी भडकली
पश्चिम नागपूरमध्ये आपण जनआशीर्वाद यात्रा काढणार असल्याचे नरेंद्र जिचकार यांनी १३ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आहे, असे ते म्हणालेत.
जिचकरांच्या यात्रेत सुनील केदार
नरेंद्र जिचकार यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली. यात काँग्रेसचे आमदार सुनील केदार सहभागी झाले. जिचकार यांनी नाना पटोलेंना लक्ष्य केलं. त्यानंतर केदार यांनीही अशीच भूमिका मांडली. त्यामुळे विदर्भ काँग्रेसमधील अतंर्गत कलह अजूनही सुटले नसल्याचे समोर आले.
हेही वाचा >> भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?
‘काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक काँग्रेसच्या हितासाठी नाही, तर भाजपच्या हितासाठी काम करतात’, असे विधान जिचकार यांनी नाना पटोले यांचा नामोल्लेख टाळत केले होते. त्याच जिचकार यांच्या व्यासपीठावर जाऊन केदार यांनीही हल्ला चढवला. त्यामुळे काँग्रेससमोर अंतर्गत कलह सोडवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे.
सुनील केदार काय बोलले?
जनआशीर्वाद यात्रेत सुनील केदार म्हणाले, “नरेंद्र जिचकार यांच्यावर अन्याय झाला आहे. अन्यायाविरोधात लढलंच पाहिजे. माझ्या भूमिकेतून मी ते स्पष्ट केलेच आहे. आम्ही अन्यायाविरोधात लढू आणि जिंकू.” त्यामुळे सुनील केदारांचा रोख कुणाकडे आहे, हेही यातून स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा >> “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं
नाना पटोलेंविरोधात यापूर्वीही एकवटले होते नेते
विधान परिषद निवडणुकी वेळीही काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. सत्यजित तांबे यांना एबी फॉर्मचा वाद असो की, अमरावती, नागपूरमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलावरून नानांना लक्ष्य केलं गेलं होतं. काँग्रेसमधील एक मोठा गट त्यांच्यावर नाराज असल्याचंही म्हटलं गेलं होतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील संघर्षही या काळात दिसून आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नाना पटोलेंच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT