Ajit Pawar Eknath shinde : ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले होते. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी साताऱ्यात होते. जितेद्र आव्हाडांनी या रुग्णालयाला भेट देत अनेक सवाल देखील उपस्थित केले होते.
ADVERTISEMENT
विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत एकनाथ शिंदे यांना चांगलंच लक्ष केलं होतं. शिंदेंच्या ठाण्यात नेमकं काय चालू आहे असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. विरोधक एकनाथ शिंदेंना घेरत असताना एका खासगी बैठकीत थेट अजित पवारांनीच एकनाथ शिंदेंना जाब विचारल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार-एकनाथ शिंदेंमध्ये काय झालेलं?
शुक्रवारी (18 ऑगस्ट) मंत्र्यांची एक खासगी बैठक पार पडली. या बैठकीला सर्वच मंत्री हजर होते. या बैठकीत राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हे सुरु असतानाच ठाण्यातील रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा थेट सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला.
यावेळी रुग्णालयात मृत्यू कसा झाला, किती रुग्ण गंभीर होते, शेवटच्या क्षणी किती रुग्ण रुग्णालयात आले, रुग्णालयावर येणारा ताण या बाबतची माहिती शिंदेंनी अजितदादांना दिली. दादा आणि शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक होण्याची शक्यता असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत विषयाला बगल दिली.
हेही वाचा >> Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!
अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल केल्याने शिंदे आणि त्यांचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा होत्या. हा वाद संपत नाही तोच सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या प्रश्नाचे समर्थन केले आहे. दादांनी प्रश्न विचारलं तर त्यात चूक काय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी थेट शिंदेंनाच सुनावलं आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
“मी टीव्हीवर ऐकलं आहे. जर अजित पवार काही प्रश्न विचारत असलील, तर त्यात चुकीचं काय आहे? ते लोकांच्या वतीनेच बोलत होते. इतके सगळे मृत्यू जर झालेत, तर त्याची कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी ना. त्यामुळे ठाण्यात जे घडलं, त्याची पूर्ण चौकशी व्हायला हवी आणि ज्याच्या चुकीमुळे इतके लोक आपण गमावलेत.”
हेही वाचा >> Congress: शिंदे, अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत.. हा माणूस काय भानगडी… : पृथ्वीराज चव्हाण
एकीकडे राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पवार आता अजितदादा गटाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. असं असताना आता सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांची बाजू घेतल्याने आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT