Surat : गणेशोत्सवाला गालबोट! गणपती मंडळावर दगडफेकीनंतर गाड्यांची तोडफोड-जाळपोळ

मुंबई तक

09 Sep 2024 (अपडेटेड: 09 Sep 2024, 09:19 AM)

Surat stone pelting at Ganesh Pandal: सुरतच्या लालगेट भागातील सय्यदपुरा भागात गणेश उत्सवादरम्यान एक मोठी घटना घडली आहे. गणेश मंडळावर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला. त्याचसोबत शेकडो लोकांनी सय्यदपुरा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने देखील केली.

surat stone pelting at genesh pandal in red get hindu communitu surrounded the police station 6 arrested

गणपती मंडळावर दगडफेकीनंतर गाड्यांची तोडफोड-जाळपोळ

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणपती बसवलेल्या मंडपावर दगडफेक

point

घटनेनंतर गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड

point

हिंदू संघटनांचे रस्त्यावर उतरून निदर्शन

Surat stone pelting at Ganesh Pandal: सुरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीनंतर जनक्षोभ पेटला होता. त्यानंतर गाड्यांची तोडफोड-जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक हिंदू समुदायामध्ये प्रचंड संताप दिसून आला. शेकडो लोकांनी सय्यदपुरा पोलीस (Police) ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली आहेत. या प्रकरणात 6 आरोपींना आणि इतर 27 लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (surat stone pelting at ganesh pandal in red get hindu communitu surrounded the police station 6 arrested)

हे वाचलं का?

सुरतच्या लालगेट (Surat Red Gate) भागातील सय्यदपुरा भागात गणेश उत्सवादरम्यान एक मोठी घटना घडली आहे. गणेश मंडळावर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला. त्याचसोबत शेकडो लोकांनी सय्यदपुरा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने देखील केली. या घटनेनंतर तणाव पाहून स्थानिक आमदारही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : Maharashtra Assembly Election Survey : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? मविआची झोप उडवणारा सर्व्हे

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक एका खोडकर तरुणाने केली होती. त्यांनी गणपती मंडपावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी पोलीस चौकीला घेराव घालून तीव्र निषेध व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

"आज सुरतच्या सय्यदपुरा भागातील गणेश पंडालवर दगडफेक झाल्याची बातमी आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत याप्रकरणी 6 जणांना अटक केली. याशिवाय या घटनेला चिथावणी देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. तपास अजूनही सुरू असून सुरतच्या सर्व भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

तसेच प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवला असून पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. हिंसाचार होऊ नये किंवा आणखी तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दल सतत परिसरात असते. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. या घटनेनंतर सुरतमधील इतर भागातही सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

तसेच या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतर 27 लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. जे अशा कृत्यांना प्रोत्साहन देत होते, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे

    follow whatsapp