Sushma Andhare : “वहिनी, एक शब्द देतेय…”, रश्मी ठाकरेंना अंधारेंनी काय दिलं वचन?

भागवत हिरेकर

• 02:26 PM • 23 Sep 2023

रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमा अंधारेंनी लिहिली खास पोस्ट. सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंचे कौतुक केले. त्याचबरोबर कायम शिवसेनेसाठी लढत राहीन असा शब्द सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंना दिला.

sushma andhare wrote emotional note for rashmi thackeray. andhare praised rashmi thackeray.

sushma andhare wrote emotional note for rashmi thackeray. andhare praised rashmi thackeray.

follow google news

Sushma Andhare wishes to Rashmi Thackeray on her birthday : ‘रश्मी वहिनी, तुम्ही उद्धव ठाकरे नावाच्या गलबाताला कायम समजून घेणारं बंदर आहात. तुम्ही माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर मातोश्री आणि तमाम शिवसैनिकांच्या साठीचं ऊर्जाकेंद्र आहात’, अशा शब्दात रश्मी ठाकरेंचे कौतुक करत शिवसेना (युबीटी) उपनेता सुषमा अंधारेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. सुषमा अंधारेंनी वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या या पोस्टमधून रश्मी ठाकरेंना एक वचनही दिलं. (Sushma Andhare praises Rashmi Thackeray on her birthday)

हे वाचलं का?

रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमा अंधारेनी लिहिलेली पोस्ट

प्रिय रश्मी वहिनी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुमचा माझा परिचय तसा प्रत्यक्ष मागील 14 महिन्याचा. पण त्याच्याही खूप आधीपासून तुम्ही मनात घर करून आहात. तुमची पहिली छबी मनाला प्रचंड भावली होती ती सन्माननीय पक्षप्रमुखांच्या समवेत मुख्यमंत्री म्हणून शपथविधी समारंभातला तुमचा अत्यंत रुबाबदार आणि तितकाच सोज्वळ लाघवी वावर…

तितक्याच खंबीर आणि संयमी तुम्ही दुसऱ्यांदा महाराष्ट्रला दिसल्या त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन साहेब वर्षाच्या पायऱ्या उतरून खाली उतरत होते तेव्हा त्यांच्या पाठोपाठ चालतानाचा…

हेही वाचा >> उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझी एकच खुर्ची आहे आता ती सुद्धा जाईल..’ : निलम गोऱ्हे

सुखात आणि दुःखात जोडीदाराच्या सोबत ऊन-पावसाळे झेलताना तितक्याच विश्वासाने संयतपणाने… मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुमच्या चेहऱ्यावर जो शांत समंजस आणि पूर्णत्वाचा भाव होता, तोच पूर्णत्वाचा भाव वर्षाच्या पायऱ्या उतरताना होता.. !

वर्षा या शासकीय निवासस्थानांच्या भिंती अश्लील आणि अद्वातद्वा भाषेत रंगवणे तर खूपच लांब राहिले, पण साधी कुठेही चिडचिड नाही… आदळआपट नाही… माध्यमांच्या समोर वेडेवाकडे बाईट नाही…

या दोन्ही प्रसंगातल्या तुम्ही म्हणजे नटसम्राटमध्ये रेखाटलेलं उद्धव ठाकरे नावाच्या गलबताला कायम आश्वस्त करणारे, आधार देणारे, समजून घेणारे बंदर..!!

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

मातोश्रीवर मी पहिल्यांदा आल्यावर आपली भेट झाली खरी, पण अगदीच ओझरती. माझ्या पक्षप्रवेशाच्या प्रसंगातही तुम्ही नव्हताच. शिवतीर्थावर भाषण झाल्यानंतर पुढे कधीतरी आपल्याला प्रत्यक्ष बोलू शकले. मातोश्रीवर होणाऱ्या राजकीय चर्चा किंवा निर्णय प्रक्रिया किंवा पक्षाभिमुख आखले जाणारे कार्यक्रम यात तुमचा सहभाग कुठे नसतोच. त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची संधी फार दुर्लभ…

पण, तरीही पक्षाशी बेईमानी करत जे 40 बाहेर पडले, जे कधी नजर वर करून बोलू शकले नसते. ज्यांची गाव खेड्यातील गल्लीबोळांपासून ते वर्षा बंगल्यापर्यंत वावर वाढावा एवढी हैसीयत मातोश्रीने वाढवली, तेच मातोश्रीवर गरळ ओकायला लागले.

यात सगळ्यात जास्त वेदनादायी होतं ते सुतराम संबंध नसणाऱ्या तुम्हाला या सगळ्या गलिच्छ राजकारणात ओढणं… राण्यांच्या पोरांनी केलेल्या बालिश आरोपांपासून ते विकृत आणि विक्षिप्त किरीटपर्यंत…! त्या प्रत्येकानेच हौस फेडून घेतली अक्षरशः ..आणि आम्ही मातोश्रीवर बोलणार नाही बोललेलं खपून घेणार नाही असे म्हणणारे 40 आणि 40 यांचा म्होरक्या सुद्धा ज्यांनी मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्यानंतर आपल्याही हातच्या चहा पोह्यांची चव चाखली असेल, असे सगळेच मिठाला बेईमान झाले. पण तरीही तुम्ही कमालीच्या शांत…

हेही वाचा >> प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा खासदार कसे झाले होते?

एकीकडे नवरा मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे आपल्याच जीवावर वाढलेली भांडवलं आपलं घरटं उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्यासाठी कटकारस्थान करत आहे. कुटुंब म्हणून ज्यांनी आधार द्यावा असे भावभावकीचे लोक आजारपणाच्या थट्टा उडवत आहेत… महाराष्ट्राच्या लेखी उमदा नेता असला तरी तुमच्यासाठी तुमचं बाळ म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडे आरोप करण्याची चढाओढ लागली होती.. काहीजण तर गळफासाचा दोर आणि त्याचे चित्र सुद्धा ट्विट करत आपल्या विकृतीचा निच्चांक दाखवत होती. अशाही काळात मनात वेदनांचे काहूर घेऊन तुम्ही कशा एवढ्या सहनशील राहिला हे मला न उलगडलेलं कोड आहे..!

मला जेव्हा खूप लोक विचारतात ना तुम्ही शिवसेनेसाठी इतक्या जीव तोडून कशा काय बोलू शकता, याचं कारण काय तेव्हा माझ्याजवळ असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण हेही आहे की मी तुमच्यातली एक अत्यंत मर्यादाशील पत्नी आणि तितकीच मुलांच्यासाठी मुलांच्या काळजीने व्याकुळ होणारी आई जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा मी अधिक त्वेषाने लढायला सज्ज होते.

हेही वाचा >> इंदिरा गांधींनी मंदिरात जाणं टाळलं अन् संजय गांधींचा विमान अपघात; त्यादिवशी नेमकं काय घडलं?

कारण माझी शिवसेनेला किती गरज आहे याहीपेक्षा लाख पटीने अधिक या महाराष्ट्राला शिवसेनेची आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची गरज आहे. आणि त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्यानंतर अत्यंत प्राणपणाने तुम्ही जपत आलाय. एका अर्थाने तुम्ही माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर मातोश्री आणि तमाम शिवसैनिकांच्या साठीच ऊर्जाकेंद्र आहात..!!

नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांमध्ये महाराष्ट्राला आज घडीला सगळ्यात जास्त भावना तरुण नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे. त्यांच्या बोलण्यातली नम्रता आणि शिवसैनिकांशी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधतानाची विनयशीलता ही तुमच्याकडून आलेली अनुवंशिक देण आहे हे तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मनोमन पटेल.

वहिनी, मी अनेक छोट्या मोठ्या नेत्यांकडून ऐकले तुम्ही तुमचा वाढदिवस कधीही साजरा करत नाहीत . माध्यमांपासूनही अगदी ठरवून एक अंतर कायम राखून असता. पण तरीही फार धाडसाने तुमच्याबद्दल हे लिहावसं वाटलं. मी अत्यंत सर्वसामान्य माणूस. खूप विचार केला वाढदिवसाला भेटवस्तू काय देणार. काय देणार…? कारण तुमच्यासाठी तुमचं जग म्हणजे एक शब्द देतेय, “शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या मानसन्मानासाठी जीवाची बाजी लावायला केव्हाही तयार आहोत.”

    follow whatsapp