Most Wanted Terrorist : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची (shahid latif) पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दहशतवादी शाहिद पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड (pathankot airbase attack) होता. त्याच शाहिदची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. एनआयएकडून शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांमुळे तो भारत सरकारला पाहिजे होता.
ADVERTISEMENT
अनेक कारवायांमध्ये मास्टरमाईंड
शाहिद लतीफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवालामधील रहिवासी होता. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्यामुळेच तो अनेक दहशतवादी कारयावायांमध्ये सक्रिय होता. त्याला सियालकोट सेक्टरच्या कमांडरपदावर काम करण्यास सांगितले होते. भारतातील दहशतवादी कारवायांवर तो कायम लक्ष ठेऊन होता. त्याच बरोबर तो दहशतवादी हल्ल्याची योजना आपल्या दहशतवादी सहकाऱ्यांना सांगत होता.
विमानाचे अपहरण
शाहिद लतीफला 12 नोव्हेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली होती. त्याला 16 वर्षे भारतीय तुरुंगात ठेवण्यात आले होते, तर त्यानंतर त्याला 2010 मध्ये वाघा मार्गे हद्दपार करण्यात आले होते. पंजाबमध्ये जानेवारी 2016 मध्ये ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी शाहिद लतीफ हा त्या हल्ल्यातील मास्टरमाईंड होता. त्याच बरोबर इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले त्यावेळीही शाहिद हा आरोपी होता.
हे ही वाचा >> Ncp Crises: शरद पवारांचे समर्थक ‘कलानी कुटुंब’ दादांच्या भेटीला; राजकारणात खळबळ
भारताचे 7 जवान शहीद
पंजाबमधील पठाणकोट येथील 2016 मध्ये एअरबेसवर दहशतवादी हल्ला त्या हल्ल्यातही जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा त्यामध्ये हात होता. या हल्ल्यात लष्कराचे 7 जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरफोर्स स्टेशन हे लष्कराच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने त्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलमची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली होती. तर हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याचा रावळपिंडीत गोळ्या घालून खात्मा करण्यात आला होता. भारत सरकारने त्याला गेल्या वर्षी दहशतवादी म्हणून घोषित केले होते. रावळपिंडीत बसून तो जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रसद आणि इतर साधनसामुग्री पुरवत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.
इजाज पाकिस्तानात फरार
दहशतवादाला खतपाणी घालणारा इजाज अहमद अहंगरची 22 फेब्रुवारी 2023 मध्ये काबुलमध्ये खात्मा करण्यात आला होता. 1996 मध्ये काश्मीर तुरुंगातून सुटल्यानंतर तो पाकिस्तानात फरार झाला होता. तेथून पुढं तो अफगाणिस्तानात पळून गेला होता. त्यामुळे त्याला भारत सरकारने मोस्ट वॉण्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
रझाचे दहशतवादी प्रशिक्षण
अल बद्रचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याचीही पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल बद्र याच्याकडून तरुणांची माथी भडकवून काश्मीरच्या परिसरात तो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. सय्यद खालिद रझाचीही कराचीमध्ये त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. शूटरने रझाच्या डोक्यात गोळी झाडली होती.तो काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात सक्रिय होता.
हे ही वाचा >> ‘अल्पवयीन मुलींना पाहून मी विचलित होतो..’ अन् वासनांध आरोपी जायचा मंदिरात!
शालोबर काश्मीरमध्ये सक्रिय
भारताच्या वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट असलेला सय्यद नूर शालोबर याची पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली होती. शालोबर पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयची मदत घेऊन तो काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत होता. त्याचबरोबर तो दहशतवादी प्रशिक्षणही देत होता.
छुप्या पद्धतीने हल्ला
पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या रावळकोटमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणावेळी दहशतवादी मोहम्मद रियाझयाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. मोहम्मद रियाझ हा अबू कासिम काश्मिरी नावानेही ओळखले जात होता. त्यावेळी त्या काश्मीरमध्ये 5 जवान शहीद झाले होते. तो हल्ला करण्याचे कारस्थान अबू कासिमने रचले होते. त्याच्याकडून भारतीय लष्करावर छुप्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केले जात होते.
ADVERTISEMENT