IAS Coaching : UPSC कोचिंग सेंटरमध्ये 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, घटना घडली कशी?

मुंबई तक

• 10:47 AM • 28 Jul 2024

IAS Coaching flood : दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये असलेल्या Rau's IAS Study Circle कोचिंग सेंटरमध्ये युपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोन विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. (IAS coaching centre basement flooded in Delhi)

युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

point

युपीएससी कोचिंग सेंटरमधील घटना

point

दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

IAS Coaching : स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटरचे हब समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील राजेंद्रनगरमध्ये दुर्दैवी घटना घडली. UPSC परीक्षेची तयारी करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे 27 जुलैच्या सायंकाळी अचानक Rau's IAS Study Circle या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पाणी भरलं. पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Three Students Dead After Flooding In Delhi Rau's IAS Study Circle Coaching Centre Basement)

हे वाचलं का?

27 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली की, राव आयएएस स्टडी सर्कल कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरले आहे. पाण्यात विद्यार्थी अडकले आहेत. 

अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोटारी लावून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा पाण्यात शोध घेतला गेला. रात्री साडेदहा वाजता दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह जवानांना मिळाले. त्यानंतर थोड्या वेळाने आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला. 

तळमजल्यावर विद्यार्थी कसे बुडले?

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसमेंटमध्ये राव आयएएस स्टडी सर्कल कोचिंग सेंटरचे ग्रंथालय आहे. तिथे विद्यार्थी अभ्यासासाठी जातात. विद्यार्थी अभ्यास करत असतानाच अचानक पाणी भरले गेले आणि तिघांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा >> कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल राधाकृष्णन? 

ज्यावेळी अचानक पाणी आले, तेव्हा जवळपास 35 विद्यार्थी ग्रंथालयात होते. सुरूवातीला तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा जनक्षोभ उसळून आला. विद्यार्थ्यांनी MCD च्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली.

Rau's IAS Study Circle सेंटरमध्ये पाणी कसे भरले?

दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी सांगितले की, एक नाला फुटला आणि त्यानंतर बेसमेंटमध्ये जोरात पाणी येण्यास सुरूवात झाली.

हेही वाचा >> वळला अन् 'लोकल'मधून पडला; 'त्या' प्रवाशाचं काय झालं?  

आपचे आमदार दुर्गेश पाठक हे म्हणाले की, "एका ठिकाणी नाला फुटला. त्यामुळे पाणी बेसमेंटमध्ये घुसले. पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले. नाला बंद झाला असता, तर इतर इमारतींमध्येही पाणी भरले असते. पण, एकाच ठिकाणी नाला फुटल्याने बेसमेंटमध्ये पाणी भरले गेले."

न्यायालयीन चौकशीचे आदेश

दिल्लीच्या शिक्षण मंत्री अतिशी यांनी न्यायालयीने चौकशीचे आदेश दिले आहेत. २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितलं?

जुन्या राजेंद्रनगरचे डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, "आम्ही गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे. प्रकरणाचा तपास करून सत्य शोधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, आतापर्यंत दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे."

    follow whatsapp