Wagh Nakh : वाघनखं खरी की खोटी... सरकार आणि इतिहास संशोधकाचा दावा काय?

मुंबई तक

19 Jul 2024 (अपडेटेड: 19 Jul 2024, 07:55 PM)

Wagh Nakh News : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या कोथळा बाहेर काढण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला होता, तीच हीच वाघनखं असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत,असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे

wagh nakh brought from london victoria and albert museum real or fake sudhir mungantiwar indrajit sawant chhatrapati shivaji maharaj afzal khan ripped apart

बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत.

point

''लंडनहून आलेली वाघनखं शिवरायांची नाहीत''

point

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला दावा

Wagh Nakh News : लंडनच्या व्हिक्टोरीया अॅड अल्बर्ट संग्रहालयातून बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचली आहेत. साताऱ्यात ही वाघनखं आजपासून प्रदर्शनासाठी ठेवली गेली आहेत. आणि उद्यापासून नागरीकांना ही वाघनखं पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या कोथळा बाहेर काढण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला होता, तीच हीच वाघनखं असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. तर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत,असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे.त्यामुळे विरोधकांनी देखील वाघनखांवरून सरकारला घेरलं आहे. त्यामुळे साताऱ्यात आलेली वाघनखं खरी की खोटी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (wagh nakh brought from london real or fake sudhir mungantiwar indrajit sawant chhatrapati shivaji maharaj afzal khan ripped apart)

हे वाचलं का?

मुनगंटीवारांचा दावा काय? 

विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की,  अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली होती. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे पाठवली होती. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. 

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana GR Download: लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील!

तसेच लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली होती. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला दिली होती.

वाघनखं आणण्यासाठी किती खर्च झाला? 

वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च आला नसल्याचे सांगत हे पूर्ण असत्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते. या वाघनख्यांसोबत छत्रपती शिवरायांचा इतर शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी लागणाऱ्या म्युझियमच्या डागडूजीसाठी आणि नूतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. 

''लंडनहून आलेली वाघनखं शिवरायांची नाहीत'' 

 लंडनहून आणली जाणारी वाघनखं  ही शिवरायांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पुष्टीही दिली होती. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही . पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटले होते.

हे ही वाचा : Pune Accident : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला, महामार्गावर रक्ताचा सडा; काय घडलं?

 ''मी सत्य सांगतोय ज्या संग्रहालायातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणत आहेत. ते संग्रहालाय सांगत आहेत, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही गोष्ट संग्रहालयचे संचालकांनी हो गोष्ट करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे'', असे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने पत्रात लिहिले आहे.

 सरकारच्या जाहिरातीत लपवा छपवी 

विशेष राज्य सरकारने पेपरमध्ये ज्या जाहिराती दिल्या आहेत, त्या जाहिरातीतही ही वाघनखं शिवरायांची असल्याचा उल्लेख नाही आहे. ''व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय येथून आणलेल्या 'वाघनखे' या खास आकर्षणासह'' या शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा उल्लेख टाळलेला स्पष्ट दिसतोय.तसेच खाली शिवरायांची वाघनखं असल्याचा उल्लेख आहे, मात्र ती ''व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातलीच आहेत का? हे सांगण्यात आलेले दिसत नाही. इतकंच नाही तर ज्या शिवरायांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्या वाघनखांची जाहिरात सरकार वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर न करता आतल्या पानावर करतं? यातच सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असल्याचेही बोलले जात आहे.  

दरम्यान या वाघनाखाच्या मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला घेरलं आहे. आणि वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची आहेत का? याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. 
 

    follow whatsapp