"दूर गेलेली पायलट लेक विमानातच भेटली अन्..'', मराठमोळे माजी सैन्य अधिकारी अशोक केतकरांची 'ही' Story खरी की खोटी?

Harsh Goenka: बाहेर सूर्य मावळत होता आणि विमान दिल्ली विमानतळावर उतरत होतं. तर दुसरीकडे अशोक केतकरांच्या आयुष्यानं पुन्हा एकदा तसंच उड्डाण घेतलं होतं जसं त्यांचं जेट फायटर प्लेन घ्यायचं.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Mar 2025 (अपडेटेड: 27 Mar 2025, 03:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माजी विंग कमांडर अशोक केतकर यांना सुख:द धक्का

point

विमानात प्रवास करत असताना भेटली लेक आणि नातू

point

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेली पोस्ट नेमकी काय?

Harsh Goenka : आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात.  ते नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करुन युजर्सचं लक्ष वेधत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अशीच एक हृदयस्पर्शी घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये भारतीय वायुसेनेचे मराठमोळे माजी विंग कमांडर अशोक केतकर यांच्यासोबत घडलेली एक कहाणी सांगितली. आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर एखाद्याला कसा सुखद धक्का मिळू शकतो हे त्यांनी या कहाणीतून सांगितलं. पण हर्ष गोयंका यांनी शेअर केलेली कहाणी खरी आहे की खोटी यावरून सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "मीच अपहरण करून संतोष देशमुखांना संपवलं", पोलिसांसमोर 'या' आरोपीची कबुली 

मराठमोळ्या अधिकाऱ्याविषयी हर्ष गोएंका यांची एक्सवरची नेमकी पोस्ट काय?

हर्ष गोएंका यांनी एक्सवर याबाबत पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, मुंबई विमानतळावर व्हिलचेअरवर बसलेले विंग कमांडर अशोक केतकर दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढले. देशसेवेत अशोक यांनी आपले दोन्ही पाय गमावले होते. पण त्यांची मुलगी भार्गवी त्यांच्यापासून दूर गेल्यानं ते आतून अक्षरश: तुटले होते. भार्गवीने त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. या घटनेला पाच वर्ष झाले होते आणि ते तिला एकदाही भेटले नव्हते. 
 
दरम्यान, विमान हवेत असतानाच पायलटने एक अनाऊन्समेंट केली. अशोक यांची ओळख करुन देताना ते वॉर हिरो आहे असं सांगितलं. अनाऊन्समेंटमध्ये पुढे असं सांगण्यात आलं की, "सर, ज्या मुलीशी तुम्ही नातं तोडलं, ती भार्गवी हे विमान उडवतेय." हे ऐकून अशोक यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेवढ्यात एक लहान मुलगा पाणी घेऊन त्यांच्याकडे आला आणि त्यांना कळलं की तो त्यांचा नातू आहे.

"बाबा मला माफ करा..."

काही क्षणातच भार्गवी कॉकपिटमधून बाहेर आली. तिनं वडिलांना नमस्कार केला आणि म्हणाली, "बाबा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. मी आता पायलट आहे. मला माफ करा." भावनिक झालेल्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. त्याचवेळी त्यांचा नातू म्हणाला, आजोबा, मलाही तुमच्यासारखं फायटर पायलट व्हायचं आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून विमानतले इतर प्रवाशांचे डोळेही डबडबले होते. 
 

हे ही वाचा >> Jalna : शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेला दगडाने ठेचून संपवलं, अंतरवालीमध्ये नेमकं काय घडलं?

बाहेर सूर्य मावळत होता आणि विमान दिल्ली विमानतळावर उतरत होतं. तर दुसरीकडे अशोक केतकरांच्या आयुष्यानं पुन्हा एकदा तसंच उड्डाण घेतलं होतं जसं त्यांचं जेट फायटर प्लेन घ्यायचं. हर्ष गोएंका यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. ही भावनिक कथा वाचून अनेकांची डोळे पाणावले.

दरम्यान, हर्ष गोयंका यांनी सांगितलेली ही कथा खरी आहे की खोटी? यावरून सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. हर्ष गोयंकांच्या पोस्टवर अनेक जण रिप्लाय देत काही सवाल उपस्थित करत आहेत. एका यूजरने तर हर्ष गोयंका यांनी सांगितलेल्या कथेवरून त्यांना उपरोधिकपणे टोले लगावले आहेत. ही कहाणी खरी नसल्याचं त्याला त्याच्या ट्वीटमधून सुचवायचं आहे. 

सोशल मिडियावर सध्या ही स्टोरी चांगलीच व्हायरल होते आहे. ही स्टोरी खरी आहे की नाही हे माहिती नाही, मात्र भावनिक आहे असं अनेकांनी प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे. तर काहींनी थट्टा उडवत ही चित्रपटासाठी चांगली पटकथा असल्याचं म्हटलंय.

    follow whatsapp