Singapore Viral News : कोट्यावधी रुपयांची टेक कंपनी सुरु करणाऱ्या एका उद्योगपतीने त्यांच्या आयुष्यात घडलेला भयानक प्रसंग एक्सवर सांगितला आहे. पोलीस आणि पत्नीकडून कशाप्रकारे छळ केला जात आहे, याबाबत त्यांनी सांगितलं आहे. सिंगापूरचे क्रिप्टो सोशल नेटवर्क OxPPL डॉट कॉमचे संस्थापक प्रसन्ना शंकर यांची ही संपूर्ण कहाणी आहे. त्यांनी रिपलिंग नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटलंय, माझा घटस्फोट होत आहे. मी चेन्नई पोलिसांना चकवा देत फरार झालो आहे. मी तामिळनाडूच्या बाहेर लपलो आहे, अशी माझी स्टोरी आहे. दरम्यान, चेन्नई जन्मलेल्या प्रसन्न यांनी NIIT मधून शिक्षण पूर्ण केलं आहे.
ADVERTISEMENT
पत्नीने अन्य पुरुषाकडून मागितला कंडोम
प्रसन्न यांनी म्हटलंय की, माझे लग्नसंबंध खराब होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. माझी आणि दिव्याची ओळख NIIT मध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. दोघांच्या लग्नाला दहा वर्ष झाले आहेत. आम्हाला 9 वर्षांचा एक मुलगा आहे. जेव्हा मला माहित झालं की, माझ्या पत्नीचं अनूप नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध आहे, तेव्हापासून आमच्या लग्नसंबंधात दूरावा निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> काजू-बदाम अन्.. 'सौगत-ए-मोदी' किटमध्ये लोकांना काय-काय मिळणार?
घटस्फोट, खोट्या तक्रारी आणि बलात्काराचे आरोप
प्रसन्न यांनी म्हटलंय की, आमच्यात चर्चा सुरुय की, घटस्फोटानंतर मला पत्नीला किती मिलियन डॉलर द्यावे लागतील. त्यावेळी माझी पत्नी नाराज झाली आणि माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मी तिचा बलात्कार केला, असं आरोप तिने माझ्यावर केले आहेत. तसच मी तिचे न्यूड व्हिडीओ व्हायरल केले आहेत, असेही आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. सिंगापूर पोलिसांनी याबाबत तपास केला आणि मी निर्दोष असल्याचं म्हटलं.
प्रसन्नने आरोप करत म्हटलंय, दिव्याने त्याच्या 9 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्याने स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, कोर्टने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. आम्ही एमओयू साईन केलं होतं. मी त्यांना जवळपास 9 कोटी रुपये आणि प्रत्येक महिन्याला 4.3 लाख रुपये देण्याचं ठरलं. दिव्याने एमओयूच्या अटी मान्य करण्यास नकार दिला होता.
हे ही वाचा >> देशभरात तुफान चर्चा सुरू असलेलं 'सौगात-ए-मोदी' हे आहे तरी काय?
एमओयूमध्ये नेमकं काय?
प्रसन्ने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, एमओयूनुसार, माझ्या मुलाचे पासपोर्ट कॉमन लॉकरमध्ये ठेवायचे होते. ज्याला त्यांनी नकार दिलं. एमओयू व्हॅलिड नाही, असा दावा त्यांनी केला होता. त्यांना अधिक वेळ हवा होता आणि घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा अमेरिकेला जाण्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
