Maharashtra Weather Forecast on March 29, 2025: मुंबई: महाराष्ट्रात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असून, येत्या 29 मार्च 2025 रोजी राज्यात हवामानाचे विविध पैलू दिसून येतील. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अन्य हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आज (29 मार्च) राज्याच्या वेगवेगळ्या भागांत वेगळवेगळ्या हवामानाची स्थिती अनुभवायला मिळेल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखाही कायम राहील.
ADVERTISEMENT
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र
कोकण पट्ट्यात, विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये, 29 मार्च रोजी सकाळी ढगाळ वातावरण असेल. दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, परंतु आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवू शकतो. पुणे, सातारा आणि कोल्हापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही दुपारपर्यंत उष्णता कायम राहील, पण संध्याकाळी हलका पाऊस किंवा मेघगर्जना होऊ शकते. येथे कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> पुण्यात रस्त्यावर पेन विकणाऱ्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन आरोपींनी गाडीवर घेऊन जात...
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
प. महाराष्ट्रातील कोल्हापूर आण सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तर सोलापुरात तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावमध्येही तापमान 35 ते 37 अंशांदरम्यान राहील.
मराठवाडा आणि विदर्भ
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 29 मार्च रोजी हवामान उष्ण आणि कोरडं असेल. तर विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्येही उष्ण वातावरण असेल. येथे तापमान 37 ते 39 अंशांदरम्यान राहील.
हे ही वाचा>> 'मोठ्या साईजचा कंडोम घेऊन ये...', पत्नीचं ते चॅट नवऱ्यानेच आणलं जगासमोर, स्क्रिनशॉटच दाखवला!
मुंबई आणि ठाणे
मुंबई आणि ठाणे येथे 29 मार्च रोजी उष्ण आणि दमट वातावरण असेल, तर कमाल तापमान 34 अंशांपर्यंत जाईल. शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. हवामान विभागाने मुंबईकरांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी पित राहण्याचा आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा
हवामानातील या बदलांचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे. तसेच, पिकांची काळजी घेण्यासाठी पावसापूर्वी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.
ADVERTISEMENT
