Worli Accident : मिहीरने BMW वांद्र्यात सोडली अन् रिक्षाने... वाचा Inside Story

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 04:43 PM)

Worli hit and run case update : मिहीर शाह काल रात्री 11 वाजून 8 मिनिटाच्या दरम्यान चार मित्रांसोबत मर्सिडीज कारने आला होता. या दरम्यान त्यांच्यासोबत एकही मुलगी नव्हती. बारमध्ये या मित्रांनी जेवण आणि दारू प्यायले होते.

worli hit and run case update accused mihir shah left bmw in bandra kala nagar and travel from riksha inside story worli accident

वरळी हिट अँड रन प्रकरणात दोघांना अटक

follow google news

बातम्या हायलाइट

point

मिहीर अपघातानंतर कसा फरार झाला होता?

point

मिहीर शाह वाइस ग्लोबल तपास या बारमध्ये बसला

point

बारमध्ये त्यांनी 18 हजार 730 रूपयांचं बिल केलं होतं.

Worli hit And Run Case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) हा सध्या फरार आहे.मात्र मिहीरचे वडील शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) आणि ड्रायव्हर राजऋषी बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे या दोघांची चौकशी आणि मुख्य आरोपीचा शोध सुरु असताना मिहीर अपघातानंतर कसा फरार झाला होता? याची मोठी माहिती समोर आली आहे. (worli hit and run case update accused mihir shah left bmw in bandra kala nagar and travel from riksha inside story worli accident) 

हे वाचलं का?

खरं तर रविवारी वरळीतील नाखवा दाम्पत्य मासे लिलावासाठी जात असताना मागून येणाऱ्या बीएमडब्लू कारने दुचाकीला धडक दिली होती.या अपघातातून प्रदिप नाखवा हे सुखरूप बचावले होते. मात्र कावेरी नाखवा यांना बीएमडब्लू कार चालकाने फरफटत नेले होते. ज्यामुळे कावेरी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर प्रदीप नाखवा यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपी तितक्यात फरार झाला होता. 

हे ही वाचा : Mumbai rains : नवरा-बायको बाहेर पडले अन् पाण्यात अडकली कार

अपघाताची घटना घडल्यानंतर मिहीर वांद्र्याच्या कलानगर भागात बीएमडबल्यु गाडी सोडून फरार झाला होता. त्यानंतर मिहीरने रिक्षाने प्रवास केला होता.सुत्रांनुसार मिहीरने  रिक्षाने गर्लफ्रेंडच घर गाठलं होतं. गर्लफ्रेडचं घर गाठल्यानंतर मिहीर काही तास तिच्या घरात बसून होता. त्यानंतर मिहीरने तिच्या घरातून बाहेर पडला होता. यानंतर त्याचा फोन बंद येत असून तो फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याच्या मागावर आहे.

मिहीरने बारमध्ये नेमकं काय केलं? 

पोलीस या घटनेचा तपास करता एका बारमध्ये पोहोचली होती. वरळीतील अपघातापुर्वी मिहीर शाह वाइस ग्लोबल तपास या बारमध्ये बसला होता. या बारचे मालक करण शाह यांनी सांगितले की, मिहीर शाह काल रात्री 11 वाजून 8 मिनिटाच्या दरम्यान चार मित्रांसोबत मर्सिडीज कारने आला होता. या दरम्यान त्यांच्यासोबत एकही मुलगी नव्हती. बारमध्ये या मित्रांनी जेवण आणि दारू प्यायले होते. यामध्ये मिहीरने दारू प्यायली नव्हती, त्याने रेडबुल घेतली होती, अशी मोठी माहिती करण शाह यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Belapur Train Accident : लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना

बारमध्ये त्यांनी 18 हजार 730 रूपयांचं बिल केलं होतं. हे बिल त्यांच्या मित्राने भरले होते.विशेष म्हणजे हे चारही मित्र मर्सिडीजने आले होते आणि मर्सिडीजनेच गेले होते. आणि अपघात हा बीएमडबल्यु गाडीने झाल्याचे करण शाह यांनी येथे नमुद केले होते. रात्री 1 वाजून 40 मिनिटाने हे तरूण गेल्याचे बार मालकाने सांगितले. पोलिसांनी देखील या बारची चौकशी केली आहे. या बारमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. 

या प्रकरणात पोलीस सध्या मिहीरचा कसून शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

    follow whatsapp