महालक्ष्मीचे 32 तुकडे कोणी केले, अनैतिक संबंध अन् हत्या..? 'त्या' घटनेची Inside Story

रोहिणी ठोंबरे

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 06:44 PM)

Crime Story : बंगळुरुच्या मल्लेश्वरम परिसरातील, विनायक नगर इथल्या एका इमारतीतली ही घटना आहे. 26 ते 29 वर्षांच्या महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बंगळुरुच्या मल्लेश्वरम परिसरातील एका इमारतीतली ही घटना

point

महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये

point

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले

Karnatak Crime Story : तिच्या शरीराचे 32 तुकडे फ्रिजमध्ये आणि खोलीत सडत होते, घरात अनेक ठिकाणी सुकलेल्या रक्ताचे डाग होते आणि अळ्या फिरत होत्या. संपर्क होत नाही म्हणून तिच्या घरी आलेल्या आई आणि बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा तिच्याच शरीराचे तुकडे त्यांना घरात दिसले. अजूनही शरीराचे काही तुकडे मिसिंग असल्याचं सांगण्यात येत आहे. या भयानक घटनेने अख्ख बंगळुरु हादरलं आहे. नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात. (bengaluru crime news ashraf killed mahalkshmi murder case chopped in 32 pieces)

हे वाचलं का?

बंगळुरुच्या मल्लेश्वरम परिसरातील, विनायक नगर इथल्या एका इमारतीतली ही घटना आहे. 26 ते 29 वर्षांच्या महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा महालक्ष्मीच्या बंगळुरुमधील घरातून दुर्गंधी येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारपाजारच्यांनी तक्रार केल्यानंतर महालक्ष्मीची आई मीना राणा आणि तिची बहिण तिच्या घरी आल्या. घराचा दरवाजा बाहेरुनच बंद होता. दरवाजा तोडून मीना राणा आत गेल्या. तेव्हा त्यांना घराच्या फ्लोअरवर अनेक ठिकाणी सुकलेल्या रक्ताचे डाग दिसले. मीना राणांनी जेव्हा फ्रिज उघडला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली कारण त्या फ्रीजमध्ये त्यांच्या मुलीच्या शरीराच्या मृतदेहाचे तुकडे होते. किचनमध्ये फ्लोअरवर किडे फिरत होते. मीना राणाने त्यानंतर आपल्या जावयला फोन केला आणि त्याने पोलिसांना बोलावलं. पोलिसांना आत्तापर्यंत मृतदेहाचे तुकडे जमा केले तर ते सुमारे 30 ते 32 तुकडे होते. काही माध्यमांच्या बातमीनुसार महालक्ष्मी राहत असलेल्या घराच्या बेडरुममध्ये तिच्या शरीराचे तुकडे पोलिसांना आढळले. ते शरीराचे तुकडे हे महालक्ष्मीचेच असल्याची ओळख पोलिसांनी पटवली आहे. महालक्ष्मीच्या शरीराचे आणखीन काही तुकडे गायब असल्याचे सध्या म्हटले जात आहे. याबाबत खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : "तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल", अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल! सरकारला केला थेट सवाल

महालक्ष्मी आपल्या पतीपासून (हेमंत) विभक्त राहत होती. तिला 4 वर्षांचा मुलगा आहे तो तिच्या पतीसोबत राहतो. तिच्या पतीचे नाव हेमंत दास असून त्याचे एक मोबाईल शॉप आहे. मीना राणा (महालक्ष्मीची आई) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचं त्यांच्या मुलीबरोबर 2 सप्टेंबरला फोनवरुन बोलणं झालं होतं. या शेवटच्या संभाषणात महालक्ष्मीने आपल्या पतीला भेटायला जात असल्याचं आपल्या आपल्या आई, मीना राणांना सांगितलं होतं. 

सध्या पोलीस महालक्ष्मीच्या हत्येचं कारण आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे. महालक्ष्मीची आई आणि तिचा एक्स पती यांनी अशरफ नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. नेलमंगलच्या एका सलूनमध्ये अशरफ काम करत होता. त्याचे आणि महालक्ष्मीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप महालक्ष्मीच्या एक्स पती हेमंतने केला आहे. 2023 च्या एप्रिल-मेमध्ये महालक्ष्मी आणि अशरफच्या अनैतिक संबंधांबाबत हेमंत दासला कळालं आणि त्यानंतर महालक्ष्मीबरोबरचे संबंध तोडल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. त्यानंतर महालक्ष्मी मागच्या 9 महिन्यांपासून संपर्कात नव्हती असंही त्याने पोलिसांना सांगितलं. तसंच अशरफ महालक्ष्मीला ब्लॅकमेल करत होता असा आरोपही महालक्ष्मीच्या एक्स पती हेमंतने केलाय. हेमंत दासच्या जबाबानुसार अशरफविरोधात महालक्ष्मीने नेलमंगला पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. दरम्यान शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीला न्यायला आणि सोडायला एक माणूस यायचा. 

पोलिसांना महालक्ष्मीच्या शरीराचे जे तुकडे आढळले आहेत त्यावरुन असा अंदाज लावण्यात येतोय की सुमारे 15 दिवसांपूर्वीच महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती आणि साधारण 5 दिवसांपूर्वी तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. महालक्ष्मी आणि तिच्या आईचं 2 सप्टेंबरनंतर बोलणं झालं नव्हतं त्यामुळे असा अंदाज लावण्यात येतोय की महालक्ष्मीची हत्या सुमारे 15 दिवसांपूर्वी झाली असावी. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतरच महालक्ष्मीची हत्या केव्हा झाली याचा खुलासा होईल. 

हेही वाचा : Bank Holiday In October: मजाच मजा... ऑक्टोबरमध्ये तुफान सुट्ट्या, यादी पाहा अन्...?

सध्या महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. पण शरीराचे सर्व भाग सापडलेले नाहीत अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. माहितीनुसार महालक्ष्मीच्या शरीराचे सुमारे 28 तुकडे पोलिसांना सापडले आहेत आणि काही तुकडे  मिसिंग आहेत. यात खरं काय हे पोलिसांनाच माहित आहे.  पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्या हाती अद्याप कुठलाही पुरावा किंवा क्लू लागलेला नाही. या प्रकरणात महालक्ष्मीचा मृतदेह आहे तेवढाच काय तो... महालक्ष्मीच्या कुटुंबियांकडून केलेले आरोप शेजाऱ्यांनी दिलेली माहिती याच्याआधारे पोलीस सध्या महालक्ष्मीच्या हत्येबाबत सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. यात अशरफवर आरोप केल्यामुळे पोलिसांसाठी सध्या तो प्राईम सस्पेक्ट आहे. पोलिसांचा तपास सध्या या प्रकरणात महालक्ष्मीची आई आणि नवऱ्याने केलेले आरोप, फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टवर आधारीत असणार आहे.

    follow whatsapp