Akshay Shinde Encounter Latest Update : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आलीय. पोलीस चकमकीत अक्षय शिंदे ठार झाला आहे. पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदेने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयचा एन्काऊंटर केला. या सर्व प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उडवली आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केला आहेत. (Information about the encounter of Akshay Shinde, accused in the Badlapur sexual assault case, is out. Police Inspector Sanjay Shinde Killed Accused Akshay Shinde)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अक्षयला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. पोलिसांनी दावा केला आहे की, अक्षयने बंदूक हिसकावून गोळीबार केला. या फायरिंगमध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत.पीआय संजय शिंदे यांनी आरोपी अक्षयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिंदे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अक्षयवर गोळी झाडली आणि या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500? आदिती तटकरे काय म्हणाल्या?
कोण आहेत पोलीस निरीक्षक संजय शिंदे?
ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या एन्टी-एक्सटॉर्शन सेलमध्ये IPS प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी 1983 मध्ये पोलीस दलात सामील होऊन आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक गुन्हेगारांचा एनकाऊंटर केला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी गँगस्टर दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली होती, त्या अधिकाऱ्यांसोबत संजय शिंदे यांनी काम केलं आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने गठीत केलेल्या विशेष तपास टीम (SIT) मध्ये सामील केलं होतं. ही टीम बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करत आहे.
संजय शिंदे यांच्यावर टीकाही झाली होती. हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी विजय पालांडेने पोलीस कस्टडीतून पळ काढला होता. शिंदे यांनी आरोपील मदत केली होती, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यांची वर्दीही पालांडेच्या कारमध्ये सापडली होती. संजय शिंदे यांना 2014 मध्ये मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा टीममध्ये सामील करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> "तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल", अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल! सरकारला केला थेट सवाल
सरकारने लिहिली अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची स्टोरी - प्रियंका चतुर्वेदी
या घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर आरोप केला आहे की, त्यांनी आरोपीला कोर्टात हजर होण्यापूर्वीच मारलं आहे. यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हणाल्या, हे सरकार सक्षम नसल्याचं समोर आलं आहे. ही फक्त एक स्टोरी आहे, जी सरकारने लिहिली आहे आणि त्यानुसार सर्वकाही घडलं.
ADVERTISEMENT