Akshay Shinde Encounter Case Update : बदलापूरमधील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गोळीबारात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एकीकडे विरोधकांकडून अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा एन्काऊंटर केल्याचा आरोप होतो आहे, तर दुसरीकडे काही लोक पेढे वाटून आणि 'बदला' पूर्ण' झाला अशा आशयाचे स्टेटस ठेवून जल्लोष करतायत.अशात अक्षय शिंदे याला चौकशीसाठी व्हॅनने (Police Van) ठाण्यात नेले जात असताना नेमकं काय काय घडलं? हा संपूर्ण घटनाक्रम सांगणारा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट समोर आला आहे. या इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टमध्ये (Investigation report) काय आहे ? हे जाणून घेऊयात. (akshay shinde encounter attempt to murder case badlapur sexual assault accused cid to probe custodial death badlapur case breaking news)
ADVERTISEMENT
खरं तर अक्षय शिंदे यांच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली होती. यासाठीच त्याला तळोजा जेलमधून म्हणजेच नवी मुंबईतून त्याला व्हॅनमधून ठाण्याला नेले जात होते. यावेळी व्हॅनमध्ये अक्षय सोबत चार पोलीसही होते. यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर, एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन हवालदार अशा पोलिसांचा समावेश होता.
हे ही वाचा : Badlapur News: अक्षय शिंदेचा Encounter 'असा' झाला... वाचा FIR जसाच्या तसा...
हे चारही पोलीस अक्षय शिंदेला ठाण्याला घेऊन जात होते. या दरम्यान धावत्या गाडीतच अक्षयने एपीआय मोरे यांची बंदूक हिसकावली. पण ही बंदूक पुन्हा अक्षयच्या हातून खेचण्यात झालेल्या झटापटीत बंदूकीचे लॉक उघडले गेले आणि अक्षयने धडा धड तीन राऊंड फायर केले, अशी पोलीस सुत्रांची माहिती आहे. अक्षयने केलेल्या गोळीबारात एक गोळी एपीआय मोरे यांना लागली. विशेष म्हणजे ही गोळी मोरे यांच्या मांडीला चाटून गेली नाही आहे, तर ती मांडीत खोलवर घुसली आहे, अशी पोलीस सुत्रांची माहिती आहे. याबाबत मेडीकल रिपोर्ट समोर आल्यावर ही गोष्ट स्पष्ट होणार आहे.
चौथी गोळी कुणी झाडली?
व्हॅनमध्ये एकूण चार गोळ्या झाडल्या गेल्या. ज्यामधील तीन गोळ्या या अक्षयने झाडल्या आहेत. तर एक गोळी ही पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली होती.अक्षय शिंदेने बंदूक हातात घेतल्यानंतर स्वसंरक्षणासाठी संजय शिंदे यांनी ही गोळी अक्षय शिंदे याच्या चेहऱ्यावर झाडली. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण घटनाक्रम घडत असताना व्हॅन रस्त्यावर कुठेच थांबली नाही आणि थेट कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल झाली. यामागचे कारण म्हणजे, जखमींना वाचवणे हे प्रथम प्राधान्य असल्या कारणाने व्हॅन थेट कळव्याच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा : Badlapur Rape Case: कोण आहेत PI संजय शिंदे? ज्यांनी केला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
ठाणे पोलिसांकडून सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे चकमक प्रकरण हे कोठडीत मृत्यू मानले जाण्याची शक्यता आहे. तसेच हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. कैद्यांना कसे हाताळायचे यासंबंधी एसओपीमध्ये काही उल्लंघन झाले आहे का? याचा तपास आता सीआयडी करणार आहे. त्याचबरोबर ठाणे पोलिसांनी आधीच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीला पत्र लिहले आहे.
आता या प्रकरणात घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नाही आहे आणि एकही प्रत्यक्षदर्शी सापडला नाही आहे. त्यामुळे अक्षय शिंदे यांचा मृत्यू खरंच झटापटीत झाला आहे का? की त्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे? याचा तपास आता सीआयडी करणार आहे.
ADVERTISEMENT