बिजनौर: उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रिजवान नावाच्या तरुणावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. रिजवानने एका हिंदू विधवा महिलेसोबत आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. रिजवानवर आरोप आहे की, आधी त्याने विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
ADVERTISEMENT
पीडितेचे म्हणणे आहे की, रिजवानने तिला लग्नाचे आश्वासन दिलेले आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. या काळात त्याने तिच्यासोबत 3 महिने शारीरिक संबंधही ठेवले, ज्यामुळे ती गर्भवतीही राहिली. आरोपी एवढ्यावरच नाही थांबला तर त्याने तिच्या 17 वर्षांच्या मुलीला देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्याशीही त्याने शारीरिक संबंध ठेवले.
हे ही वाचा>> बेडरूममधून आवाज आल्यानंतर दिराला आली जाग! दरवाजा उघडण्याआधीच सुनेनं बॉयफ्रेंडला लपवलं, पण नंतर घडलं...
पीडित महिलेचे म्हणणे आहे की, रिजवानचा भाऊ इम्राननेही तिच्या मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि एका आरोपीला अटकही केली आहे.
रिजवानने विधवा महिलेसोबत नको ते केलं...
बिजनौर कोतवाली शहरातून हे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मोहल्ला जुलाहान येथील रहिवासी रिजवानवर खळबळजनक आरोप आहेत. कोतवाली शहरात राहणारी महिला एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. तिच्या पतीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले. तिच्या पतीच्या निधनानंतर ती तिच्या मुलीसह घरात एकटीच राहते.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी तिची ओळख रिजवान नावाच्या तरुणाशी झालेली त्यानंतर दोघेही मित्र बनले होते. मग रिजवानने तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. रिजवानने लग्नाचे आश्वासन दिले आणि नंतर तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. या काळात रिजवानने तिचं नावही बदललं.
हे ही वाचा>> प्रेमात अडकवलं, लग्नाचं आमिष दाखवून पुण्यात आणलं आणि बुधवार पेठेत विकलं... तरूणीसोबत काय घडलं?
आई आणि मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध
पीडितेचा आरोप आहे की, रिजवानने तिच्यावर 3 महिने सतत बलात्कार केला, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. यानंतर, रिझवानची नजर तिच्या 17 वर्षांच्या मुलीवर पडली. 10 ऑगस्ट रोजी ती ब्युटी पार्लरमध्ये गेली असताना रिजवान तिच्या घरी गेला आणि तिच्या मुलीसोबतही घाणेरडे कृत्य केले. यानंतर रिजवानचा भाऊ इमराननेही मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले.
पीडितेचा आरोप आहे की, गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. पण अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सर्व काही सांगितले. यानंतर पीडित महिला आणि तिच्या मुलीने संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी कारवाई केली
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सामूहिक बलात्कार, पॉक्सो कायदा आणि धर्मांतराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
