मुलाची 10वीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला नेलं, पण... डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या हेमंत जोशी यांची त्यांच्या पत्नी आणि मुलासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

 डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं! (फाइल फोटो)

डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं! (फाइल फोटो)

मिथिलेश गुप्ता

• 03:49 PM • 23 Apr 2025

follow google news

पहलगाम (जम्मू-काश्मीर): मुलाची दहावीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला फिरायला गेले. सगळं कुटुंब आनंदात होतं. पहलगामसारखं निसर्गरम्य ठिकाण पाहावं म्हणून सगळे तिथे गेले. पण याच ठिकाणी दहशतवादी आले अन् काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. काश्मिरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हेमंत जोशींची ही कहाणी. 

हे वाचलं का?

काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. हेमंत जोशी यांचं कुटुंब काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं. दहशतवाद्यांच्या गोळीबारात हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला तर त्यांचं कुटुंब थोडक्यात वाचलं. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.

कोण होते हेमंत जोशी?

डोंबिवलीच्या जोशी कुटुंबीयांनी मुलाची दहावीची परीक्षा संपल्याने काश्मीरला फिरण्याचा प्लॅन केला होता. काश्मीर पाहायला मिळणार असल्याने सगळं कुटुंब आनंदात होतं. काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जोशी कुटुंब गेलेलं असताना दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात हेमंत जोशींचा मृत्यू झाला.

हे ही वाचा>> पहलगाममध्ये 28 पर्यटकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड कोण? खतरनाक दहशतवाद्याचं नाव आलं समोर

हेमंत जोशी (वय 45 वर्ष) यांचा मुलगा ध्रुव जोशी (वय 16 वर्ष) याची नुकतंच दहावीची परीक्षा संपल्याने संपूर्ण जोशी कुटुंब हे काश्मीरला गेलं होतं. यावेळी हेमंत जोशी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मोनिका जोशी (वय 45 वर्ष) या देखील होत्या. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हेमंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी आणि मुलगा या हल्ल्यातून सुदैवाने बचावले. 

हेमंत जोशी हे एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होते तर त्यांच्या पत्नी मोनिका जोशी या खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात.
 
जोशी हे डोंबिवली मधील भागशाळा मैदानासमोरील सावित्री इमारतीमध्ये राहत होते. हल्ल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शोककळा पसरली. शेजाऱ्यांनी जोशी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जोशी यांच्या सासऱ्यांना शेजारी भेटल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचं समोर आलं. जोशींच्या निधनाच्या बातमीने शेजारच्यांना धक्का बसला आहे.

हे ही वाचा>> Pahalgam Attack: 28 निष्पापांना ठार करणारे हेच ते नराधम... फोटो आणि स्केच आलं समोर

दरम्यान, या हल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असून तीन जण डोंबिवलीतील आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी या तीन पर्यटकांची नावं आहेत. हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावं

  1. अतुल मोने, डोंबिवली
  2. संजय लेले, डोंबिवली
  3. हेमंत जोशी, डोंबिवली 
  4. दिलीप डिसले, पनवेल
  5. कौस्तुभ गनबोट, पुणे
  6. संतोष जगदाळे, पुणे  

    follow whatsapp