Husband-Wife Clash Viral Story : उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादविवादामुळे खळबळजनक घटना घडली. पत्नीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. मोहित यादव असं या तरुणाचं नाव आहे. मोहितचा मृतदेह जोली हॉलेटच्या एका रुममधून ताब्यात घेण्यात आला. या संपूर्ण घटनेशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. जेव्हा तुमच्या हाती हा व्हिडीओ लागेल, तोपर्यंत माझा मृत्यू झालेला असेल, असं या तरुणाने त्या व्हिडीओत म्हटलं. मुलांसाठी कायदा असता, तर हे पाऊल मी उचललं नसतं. मी पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचललं आहे. मम्मी-पप्पा मला माफ करा.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित यादव एका सीमेंट कंपनीत फिल्ड इंजीनियर म्हणून काम करत होता. तो औरेया जनपद येथील दिबियापूर येथे राहत होता. काही दिवस प्रेमसंबंध जपल्यानंतर त्याने प्रिया नावाच्या तरुणीशी लग्न केलं. त्यांच्या जीवनता सर्व काही ठीक चाललं होतं. याचदरम्यान, प्रियाची नियुक्ती बिहारच्या समस्तीपूरमध्ये प्रायमरी शिक्षक म्हणून झाली. त्यानंतर प्रियाच्या स्वभावात बदल झाला. तिने तिची आई आणि भावाच्या सांगण्यावरून मोहितला मानसिक त्रास दिला. दुकान, जमिन सर्व आपल्या नावावर करण्याचा दबावही टाकला.
हे ही वाचा >> 14 व्या वर्षीच IPL खेळला अन् पहिल्याच चेंडूत सिक्स; Google CEO ला चकित करणारा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने व्हायरल केलेल्या व्हिडीओत म्हटलं की, माझी पत्नी प्रियाच्या आईने माझ्या मुलाचं गर्भपात केलं आणि दागिने, साड्या स्वत:जवळ ठेवल्या. माझी पत्नी मला धमकी देत आहे. जर दुकान आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही, तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला हुंड्याच्या केस मध्ये अडकवेन. तिच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या केल्यानंतरही मला न्याय मिळाला नाही, तर माझे अस्थि नाल्यात फेकून द्या. मम्मी-पपा तुम्ही मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरलो नाही.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा >> बाबो! एका आठवड्यातच 2 हजार रुपयांनी महागलं सोनं, मुंबईसह या शहरांत 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. मृताचा भाऊ तरण प्रतापने सांगितलं की, माझा भाऊ मोहित नोएडात एका सिमेंट कंपनीत नोकरी करत होता. नोएडातच प्रिया राहत होती. तिथेच दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर दोघांनीही लग्न केलं. लग्न दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने झालं. लग्न झाल्यानंतर तीन महिने सर्वकाही ठीक होतं. त्यानंतर प्रियाने मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. घरच्यांपासूनही वेगळं केलं होतं. त्यानंतर दबाव टाकला की, घरची संपत्ती माझ्या नावावर कर, नाहीतर खोटी केस करेन.
ADVERTISEMENT
