Yashashree Shinde : दाऊद शेखने हत्या करण्यापूर्वी यशश्रीला किडनॅप केले होते?

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 05:14 PM)

Yashashree Shinde and Dawood Shaikh conection : दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांच्यात काय सुरू होते. यशश्रीची दाऊदने अपहरण करून हत्या केली का?

दाऊद शेख आणि यशश्री शिंदेची ओळख कशी झाली?

यशश्री शिंदे आणि दाऊद शेख कसे भेटले होते?

follow google news

बातम्या हायलाइट

point

यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांची ओळख कशी झाली होती?

point

दाऊद शेखने हत्या केल्याची दिली कबुली

point

यशश्री शिंदेच्या मोबाईलवर दाऊदचे कॉल

Dawood Shaikh Yashashree Shinde Update : एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला. ज्यात यशश्री शिंदे आणि दाऊद शेख हे दिसत आहे. यशश्री पुढे जाते. त्यानंतर दाऊद जातो. या व्हिडीओबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू आहे. दाऊद तिचा पाठलाग करत होता का? तिचे अपहरण केले गेले का? या चर्चाही होत आहे. या सगळ्या प्रश्नांना आता पोलिसांनी तपासानंतर उत्तर दिले आहे. (How did Yashashree Shinde And Dawood Shaikh meet)

हे वाचलं का?

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक सोकोरे यांनी सांगितले की, "मयत (यशश्री शिंदे) आणि दाऊद शेख यांची ओळख होती. मैत्री होती. मागील तीन-चार वर्ष यशश्री शिंदे या मुलाच्या संपर्कात नव्हती. असं वाटतंय की, त्यातूनच त्याने हे केले आहे.अजून पूर्ण चौकशी झालेली नाही."

यशश्री-दाऊदमध्ये झाला वाद

"दोघांचा संपर्क झाला. दोघांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणाच्या जवळपास भेटायचं ठरवलं. किडनॅपिंग वगैरे नाहीये. दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यातूनच पुढे ही घटना घडलेली आहे. वाद झाला असावा असे आम्हाला वाटतं. त्यातूनच पुढे ही घटना घडली", असे दीपक साकोर यांनी सांगितले.

हेही वाचा >> मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."  

"प्राथमिक माहिती अशी आहे की, ते एकाच ठिकाणी राहत होते किंवा एकाच ठिकाणी शिकत होते. आरोपीची पूर्ण चौकशी आम्हाला करता आलेली नाही. तपासात असे दिसले की, ते संपर्कात होते आणि ठरवून त्यांनी भेटायचं ठरवलं", अशी माहिती पोलीस अधिकारी दीपक साकोरे यांनी दिली. 

यशश्रीच्या मोबाईलवरून दाऊदला फोन

मयत यशश्री शिंदे हिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिच्या नंबरवर कुणाचे कॉल आले आणि कुणाला कॉल करण्यात आले. याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी यशश्री बेपत्ता झाली, त्याआधी सर्वाधिक कॉल दाऊद शेखच्या नंबरवरून आलेले होते. त्याचबरोबर यशश्रीनेही त्याला कॉल केलेले होते. 

हेही वाचा >> 'या' ठिकाणी पडलेला होता यशश्रीचा मृतदेह, ऑन द स्पॉट रिपोर्ट

यशश्री शिंदे आणि दाऊद शेख हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. दाऊदला यशश्रीसोबत एका गार्डनमध्ये तिच्या वडिलांनी पकडले होते. मुलीला जाळ्यात अडकवून दाऊद शेख हा तिच्यासोबत गैरवर्तन करत होता, अशी तक्रार तिच्या वडिलांनी 2019 मध्ये दिली होती. त्या प्रकारणात त्याला अटकही झाली होती. 

    follow whatsapp