जालना: जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सुनेनं तिच्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात लपवण्याचा प्रयत्न केला. जालना शहरातील प्रियदर्शिनी कॉलनी भागात ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सविता शिनगारे आहे, तर हत्येचा आरोप असलेल्या सुनेचे नाव प्रतीक्षा शिनगारे आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूने मुलींच्या केलेल्या 3 कॅटेगरी, A कॅटेगरीच्या मॉडेल्स पॉर्न शूटसाठी तब्बल...
प्रतीक्षा आणि तिची सासू सविता या दोन्ही जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात एका घरात राहत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचं भांडण झालं होतंआणि याच भांडणाचा राग मनात धरून प्रतीक्षाने तिच्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आणि ती परभणीकडे पळून गेली होती.
सुनेनेच केली सासूची हत्या
हत्येनंतर, प्रतीक्षाने तिच्या सासूचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोत्याचे वजन जास्त असल्याने ती उचलू शकली नाही. त्यामुळे सासूचा मृतदेह घरातच सोडून प्रतीक्षाने तिथून पळ काढला.
हे ही वाचा>> भयंकर... प्री-वेडिंग शूटनंतर मयुरीला होणारा नवरा आवडेना, थेट दिली सागरच्या हत्येची सुपारी!
जालना पोलिसांनी सुनेला केली अटक
सासूची हत्या करून फरार झालेल्या सुनेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
प्रतीक्षा शिंगारे हीने तिची सासू सविता शिंगारे (वय 45 वर्ष) हिची हत्या करून ती फरार झाली होती. प्रतीक्षा शिंगारे ही तिच्या सासूची हत्या करून परभणी येथे पळून गेल्याची खात्रीलायक माहिती जालना पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांच्या पथकाने आरोपी महिलेच्या परभणी येथे जाऊन मुसक्या आवळल्या. जालना पोलिसांनी तिचा अवघ्या काही तासात शोध लावून तिला जेरबंद केलं.
ADVERTISEMENT
