Noida Porn Case: नोएडा: उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाचे जोडपे देसी पॉर्न बनवून परदेशात विकत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता खळबळ उडाली. Subdigi Ventures Private Limited नावाच्या कंपनीवर ईडीने छापा टाकला तेव्हा हा संपूर्ण गोरखधंदा उघडकीस आला. ही खोटी कंपनी उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी सुरू केली होती. याच कंपनीच्या नावाखाली दोघेही त्यांच्या घरी मॉडेल्ससोबत अडल्ट व्हिडिओ शूट करायचे.
ADVERTISEMENT
एवढंच नव्हे तर त्यांनी यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉडेल्ससोबत शूट केलं होतं. त्यासाठी त्यांनी मुलींच्या वेगवेगळ्या कॅटेगरी देखील बनवल्या होत्या.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलू Xhams$#*, Strip$@% ला देशी पॉर्न विकून 'एवढे' पैसे कमवायचे, 'इथे' करायचे शूटिंग
जोडपं पॉर्नसाठी तरुणींना कसं हेरायचं?
सोशल मीडियावर जाहिराती देऊन मॉडेल्सना कामावर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ग्लॅमरस जीवनशैली आणि जास्त पैसे देण्याच्या नावाखाली मुलींना फसवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरुवातीला, मॉडेल्सना सामान्य फोटोशूट करण्यास सांगितले जात असे, नंतर हळूहळू त्यांना बोल्ड कंटेंट करण्यास भाग पाडले जात असे. अडल्ट व्हिडिओंमधून मिळणाऱ्या कमाईपैकी 25% रक्कम मॉडेल्सना देण्यात यायची. तर नीलू आणि उज्ज्वल यांच्याकडे उर्वरित 75 टक्के हिस्सा होता.
मॉडेल्सना 3 कॅटेगरी विभागलेलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल आणि नीलू यांनी मॉडेल्सना तीन कॅटेगरीमध्ये विभागले होते. A, B आणि C अशा 3 कॅटेगरीच्या मॉडेल त्यांच्याकडे होत्या.
हे ही वाचा>> उज्वल आणि नीलू 4 तासात शूट करायचे मुलींचे अडल्ट Video, अन् नंतर नवरा-बायको...
हाय-प्रोफाइल आणि लोकप्रिय मॉडेल्सना A कॅटेगरीमध्ये स्थान देण्यात आलं होतं. या मॉडेल्स लाईव्ह स्ट्रिपिंग आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी प्रचंड पैसे आकारत असत. तर B कॅटेगरीमधील मॉडेल्स या मध्यम स्तरीय होत्या. ज्या मर्यादित विशेष सामग्री तयार करायच्या आणि त्यांना थोडे कमी पैसे दिले जायचे. तर C कॅटेगरीत नवीन मॉडेल्स किंवा कमी लोकप्रिय असलेल्या मॉडेल्सचा समावेश होता. त्यांना कमी पैसे दिले जात होते आणि बहुतेकदा ते सामान्य अश्लील कंटेटसाठी काम करायच्या.
अडल्ट व्हिडिओ कोणत्या कंपनीला विकलेले?
उज्ज्वल आणि नीलूने त्यांच्या घरी पॉर्न व्हिडिओ शूट केले आणि ते सायप्रसमधील Technius Limited नावाच्या कंपनीसोबत शेअर केले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्नियस लिमिटेड ही Xhamster आणि Stripchat सारख्या पॉर्न वेबसाइट्सची ऑपरेटर आहे.
ADVERTISEMENT
