एका अंडरवेअरमुळे नव्या नवरीला पती सतीशने संपवलं, ही घटना तुम्हालाही टाकेल चक्रावून!

उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका नव्या नवरीची तिच्या पतीनेच गळा दाबून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. पतीने त्याच्या सख्या मोठ्या भावावर देखील जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

नवऱ्याने झोपेत आपल्या नव्या नवरीचीच केली हत्या

नवऱ्याने झोपेत आपल्या नव्या नवरीचीच केली हत्या

मुंबई तक

28 Apr 2025 (अपडेटेड: 28 Apr 2025, 12:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीने आपल्या नव्या पत्नीची केली हत्या

point

गोरखपूरमध्ये पतीने झोपेतच आपल्या नव्या नवरीला संपवलं

point

एक अंडरविअर बनलं संशयाचं कारण

UP News: उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका नव्या नवरीला तिच्या पतीनेच मारून टाकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्री झोपण्याच्या वेळी पतीने आपल्या नव्या नवरीचा गळा दाबून तिची हत्या केली. यासोबतच पतीने त्याच्या सख्या मोठ्या भावावर देखील जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाचं लग्न नुकतंच झालं होतं. 

हे वाचलं का?

या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच, जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरीत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आले. आरोपी तरुणाला आपल्या पत्नीचे त्याच्या मोठा भाऊ अतीश याच्यासोबत संबंध म्हणजेच अफेअर सुरू असल्याचा संशय होता, असं तपासात समोर आलं आहे. याच संशयामुळे तरुणाने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि आपल्या भावावर जीवघेणा हल्ला केला. 

हे ही वाचा: Pahalgam Terror Attack: "माझा मुलगा हे करू शकत नाही..." दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा

नेमकं काय घडलं?

गेल्या बुधवारी घरात सुनेचं स्वागत करण्याचा विधी पार पडला. रात्री संपूर्ण कुटुंबाने आनंदात एकत्र जेवण केलं. त्यानंतर सतीश त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच सरोजसोबत खोलीत गेला. दरम्यान, रात्री झोपेत असताना सतीशने पत्नी सरोजची गळा दाबून हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर सतीशने पूर्ण रात्र सरोजचा मृतदेह त्याच्या खोलीतच ठेवला होता. सकाळी त्याने आपल्या मोठ्या भावावर देखील जीवघेणा हल्ला केला. या सगळ्या घटनेनंतर आरोपी सतीश फरार झाला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून आपल्या ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा: "अक्षय शिंदेलाही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकंच...", किरण मानेंची काय म्हणाले, निशाणा कुणावर?

एक अंडरविअर बनलं संशयाचं कारण

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सतीशची चौकशी केल्यानंतर त्याला त्याच्या पत्नीचे आपल्या मोठ्या भावासोबत संबंध असल्याचा संशय होता असं सांगितलं. चौकशीदरम्यान तो म्हणाला की एक दिवस आधीच त्याने त्याच्या भावाला अंडरविअरमध्ये पाहिलं होतं. यानंतर सरोजचं तिच्या दीरासोबत अफेअर सुरू असल्याचा सतीशला संशय आला. तसेच, सतीशच्या मोठ्या भावाची प्रकृती ठीक असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. 

    follow whatsapp