संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती, तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!

संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे तब्बल 15 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून आता त्यांच्या प्रत्येक मिनिटाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती

संतोष देशमुखांना असं मारलं.. 15 Video ची मिनिट टू मिनिट माहिती

मुंबई तक

27 Mar 2025 (अपडेटेड: 28 Mar 2025, 12:05 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट

point

संतोष देशमुख यांच्या हत्येचे 15 व्हिडिओ पोलिसांच्या हाती

point

संतोष देशमुखांना कशा पद्धतीने मारलं याची मिनिट-टू मिनिट माहिती

योगेश काशिद, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक-एक धक्कादायक गोष्टी या सातत्याने बाहेर येत आहे. आता या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाला हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. संतोष देशमुख यांना कशा पाशवी पद्धतीने ठार मारण्यात आलं त्याचे Video डिटेल्स समोर आले आहेत.  मुंबई Tak ला मिळालेली ही एक्स्लुझिव्ह माहिती वाचून आपणही हादरून जाल. एवढ्या भयंकररित्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.. 

हे वाचलं का?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाइलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत. याच व्हिडिओचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट आता समोर आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नराधम आरोपी हे संतोष देशमुखांना तब्बल 2 तासांहून अधिक काळ अत्यंत निर्घृणपणे मारहाण करत होते. 

संतोष देशमुखांच्या हत्येचे मिनिट टू मिनिटचे अपडेट

3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणला सुरुवात झाल्याचा पाहिला व्हिडीओ आहे. तर शेवटचा व्हिडिओ हा. 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे.

हे ही वाचा>>  Santosh Deshmukh Case : "मीच अपहरण करून संतोष देशमुखांना संपवलं", पोलिसांसमोर 'या' आरोपीची कबुली

 

तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना मारत होत होती आणि व्हिडिओही काढत होते. याच फोटो आणि व्हिडिओसंदर्भातील डिटेल्स रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती लागले आहेत.

या व्हिडिओ आणि फोटोमधील माहितीमधून संतोष देशमुख यांना मारहाण करायला कधी सुरुवात केली आणि संतोष देशमुख यांचा मृत्यू कधी झाला हे स्पष्ट होत आहे. हे सर्व व्हिडिओ 9 डिसेंबर 2024 रोजीचे आहे

1. Video क्रमांक 1

9 डिसेंबर रोजी वेळ 15.46.06 (तीन वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली) महेश केदारचा मोबाइल मधील पहिला व्हिडिओ... VID20241209154453 हा तब्बल एक मिनिट दहा सेकंद.. 171MB चा Video आहे.. (व्हिडिओचे वर्णन.. संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायर सारख्या हत्याराने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करत आहेत.)

हे ही वाचा>> 'वाल्मिक कराडचा 'तो' मेसेज आणि सुदर्शन घुलेने दुसऱ्या दिवशी...', उज्वल निकमांचा युक्तिवाद जसाच्या तसा

2. Video क्रमांक 2 - वेळ 15.47.02

53 सेकंद 128 MB (शिवीगाळ करून मारहाण करत आहेत यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढत आहे)

3. Video क्रमांक 3 - वेळ 15.48.00 

35 सेकंद 86.9 mb (संतोष देशमुख यांना हाताने मारहाण करत आहे. तर दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे) 

4. Video क्रमांक 4 -  वेळ 15.51.43 (3 वाजून 51 मिनिट 43 सेकंद)

2.04 (दोन मिनिट चार सेकंद) 300 MB (शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण करताना शूटिंग करत आहेत. शूटिंग करणारा महेश केदार असल्याचे दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे.)

5. Video क्रमांक 5 - वेळ 15.52.26 (तीन वाजून 52 मिनिट २६ सेकंद) 

7 सेकंद (या व्हिडिओमध्ये मारहाण करताना कॉलरला उठून बसवताना दिसत आहे.)

6. Video क्रमांक 6 - वेळ 15.53.59 (3 वाजून 53 मिनिट 59 सेकंद) 

87 mb 36 सेकंद (या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसत आहे.) 

7. Video क्रमांक 7 -  15.54.22 (3 वाजून 54 मिनिट 22 सेकंद) 

35MB 14 सेकंद (तपकिरी रंगाच्या पाईपने मारहाण करताना मोबाइलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसत आहे.) 

8. Video क्रमांक 8 -  15.54.32 (3 वाजून 54 मिनिट 32 सेकंद) 

10 mb 4 सेकंद (या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहेत.) 

9. Video क्रमांक 9 - 15.55.27 (3वाजून 55 मिनिट 27 सेकंद)

127MB 52 सेकंद (या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे तसेच सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून जखमीच्या तोंडावर उभ्याने लघवी करताना दिसत आहे.)

10. Video क्रमांक 10 - वेळ (15.58.56)

2 सेकंदाचा व्हिडिओ आहे. (या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवियरवर बसून पाईपने मारहाण केली जात आहे व दुसरा व्यक्ती शूटिंग करत आहे.)

11. Video क्रमांक 11 - वेळ 15.58.56

5 सेकंद (जखमी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून दुसरा व्यक्ती शूटिंग घेत आहे.) 

12. Video क्रमांक 12 - वेळ 15.59.18 

12 सेकंद (यात संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून जबरदस्तीने केस ओढून बोलण्यास लावत असतान शूटिंग काढली जात आहे.) 

13. Video क्रमांक 13 -  वेळ  17.34.05

1.44 सेकंद (संतोष देशमुख यांना या व्हिडिओमध्ये स्कार्पिओ काळ्या रंगाच्या गाडीजवळ अंडरवेअरवर उताणे स्थितीत झोपवल्याचे दिसत आहे. तसेच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेले पॅन्ट घालताना दिसत आहेत

14. Video क्रमांक 14 - 

35.16  एक मिनिट चार सेकंद  (या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना उठवून बसवत शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियान फेकून देताना दिसत आहे.) 

15. Video क्रमांक 15 - वेळ  17.53.52 

24 सेकंद (या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विव्हळताना आवाज येत आहे.)

यासोबत आठ फोटो देखील जोडण्यात आले आहेत.

    follow whatsapp