Nandurbar Crime News : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता एका मागोमाग एक बलात्काराच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्यात आता नंदूरबारमधून (Nandurbar) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Rape case) केल्याची घटना घडली आहे. तब्बल 4 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सूरू होता. या घटनेने आता नंदूरबार हादरलं आहे. (nandurbar crime father rape her minor daughter shocking crime story nandurbar news)
ADVERTISEMENT
पोलिलांनी दिलेल्या माहिती अनुसार, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 40 वर्षीय बापाने एप्रिल 2024 ते जुलै 2024 दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यामुळे ती गर्भवती झाली होती. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मुलीने वडिलांच्या अत्याचार सहन केला होता.
हे ही वाचा : Mumbai MVA Morcha : शरद पवार, शाहू महाराज हातात हात घालून आंदोलनात चालले
दरम्यान मुलीचे पोट दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले होते. यावेळी तपासणी दरम्यान मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आली होती. याबाबत आईन मुलीला विचारले असता तिने वडिलांनी अत्याचार केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे वडिलाचे कारनामे उघड झाले होते. या घटनेने महिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर तिने मुलीसह शहादा पोलीस ठाणे गाठून पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार
दरम्यान याआधी नंदुरबार शहरात मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून माणुसकीला काळीमा फासणारं भयानक कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संबंधित कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका अशा तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, शहरातील नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस कंत्राटी सफाई कर्मचारी असणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू करून दे असं सांगितलं. यावेळी त्यातील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.पीडिती मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार रात्री आईला सांगितला. यानंतर आईने सकाळी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय
दरम्यान नंदुरबारमध्ये मागील दोन-तीन दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेला तीन दिवस होत नाही त्यातच अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे नागरीकांकडून संताप व्यक्त होतोय.
ADVERTISEMENT