Noida Porn Case and ED Raid: नोएडा: उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाचे जोडपे त्यांच्या घरी बेकायदेशीरपणे अडल्ट व्हिडिओ शूट करत असल्याचे ईडीच्या छाप्यात उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर ते हे व्हिडिओ परदेशात विकत असल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने Subdigi Ventures Private Limited वर छापा टाकला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. ही कंपनी उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी स्थापन केली होती, जे मॉडेल्ससोबत व्हिडिओ शूट करून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमवत होते. आरोपी त्यांच्या घरातूनच हा गोरख धंदा चालवत होते.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
असा आरोप आहे की, दोघांनीही त्यांच्या घरी पॉर्न व्हिडिओ शूट केले आणि ते सायप्रसमधील Technius Limited नावाच्या कंपनीला शेअर केले. ईडीच्या मते, Technius Limited, Xhamster आणि Stripchat सारख्या पॉर्न वेबसाइट्सची ऑपरेटर आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूला देशी पॉर्नसाठी मुली कुठून मिळायच्या, कसं करायचे शूटिंग?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "Subdigi Ventures Private Limited च्या खात्यात जाहिरात, मार्केट रिसर्च आणि मत सर्वेक्षण यासारख्या गोष्टींच्या नावाखाली नियमितपणे परदेशी पैसे येत होते. तथापि, हे पैसे Xhamster वर स्ट्रीम केलेल्या अडल्ट कंटेंटमधून मिळालेले असल्याचे मानले जाते.
ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, हे फेमाचे (FEMA) उल्लंघन आहे. कारण हा पैसा त्यांना अडल्ड कंटेंट विकल्यामुळे मिळत होता. जे भारतात बेकायदेशीर आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलू 'या' वेबसाइट्ससाठी घरातच बनवायचे पॉर्न, मॉडेल्सला द्यायचे 'एवढी' रक्कम!
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर आपल्या जाळ्यात गुंतवत असत. जाहिरातींद्वारे मॉडेल्सची भरती केली जात होती आणि मोठ्या कमाईच्या आमिषाने त्यांना पॉर्न व्यवसायात ढकलले जात होते. अडल्ट व्हिडिओंमधून मिळणाऱ्या कमाईपैकी 25% रक्कम हे जोडपं मॉडेल्सना द्यायचे. तर उरलेले 75 टक्के पैसे हे त्यांच्या खिशात जायचे.
3 कॅटेगरीमध्ये केलेली मॉडेल्सची विभागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल आणि नीलू यांनी मॉडेल्सना 3 श्रेणींमध्ये विभागले होते. A, B आणि C श्रेणींचे मॉडेल. हाय-प्रोफाइल आणि लोकप्रिय मॉडेल्सना A-कॅटेगरीमध्ये स्थान देण्यात आले होते. या मॉडेल्स लाईव्ह स्ट्रिपिंग आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी प्रचंड पैसे आकारायच्या. B-कॅटेगरीमध्ये मध्यम-स्तरीय मॉडेल्सचा समावेश होता. ज्यांनी मर्यादित विशेष अडल्ट कंटेंट तयार करायच्या आणि सरासरी कमाई करायच्या. तर C-कॅटेगरीमध्ये नवीन मॉडेल्स किंवा कमी लोकप्रिय असलेल्या मॉडेल्सचा समावेश होता. त्यांना कमी पैसे दिले जात होते आणि बहुतेकदा ते सामान्य अश्लील कंटेंटमध्ये काम करत होत्या.
ADVERTISEMENT
