Indapur Murder : इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे जेवण बनवण्याच्या कारणावरुन एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुराचा डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभम लालजी भारतीय (वय 35) असं खून झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करुन ताब्यात घेतले आहे.(pune crime argument among farm laborers from uttar pradesh living indapur murder case)
ADVERTISEMENT
शेतमजूर उत्तर प्रदेशातील
मृत भारतीय हा उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद जिल्ह्यातील मेजाखास तालुक्यातील लेडडी गावचा राहणारा आहे. तर आरोपी नीरजकुमार लालमणी कुशवाह हा देखील त्याच गावचा आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन आहे. फिर्यादी निलेश मारूती जांभळकर यांनीही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय या हे उत्तर प्रदेशमधील कामगार या ठिकाणी काम करत होते.
हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘मराठा आरक्षणाला शरद पवारांचा पाठिंबा नाही’; भाजपने दिला पुरावा
मध्यरात्री वादाचा बदला घेतला
तर शनिवारी (1 सप्टेंबर) दुपारी जेवण बनवण्यावरून नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला होता. दरम्यान हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता. त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. त्यानंतर गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वादही घेतला होता. मात्र, रात्री उशीरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅप वर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला.
हे ही वाचा >> Amravati crime : दिवाण बेडमधून पडत होतं रक्त, आतमध्ये सापडले मायलेकाचे मृतदेह
कोयत्याने मान तोडली
जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.
ADVERTISEMENT