Crime News : प्रेमात वेडा झाला अन् मर्डर केला, गर्लफ्रेंसाठी तरुणाला घातल्या गोळ्या

भागवत हिरेकर

24 Aug 2023 (अपडेटेड: 24 Aug 2023, 12:18 PM)

In Sultanpur, UP, lover shot a young man who harassed his girlfriend’s younger sister, shocking revelation in the murder of retired inspector’s son

UP Murder News: In Sultanpur, UP, a young man who was madly in love committed the murder.

UP Murder News: In Sultanpur, UP, a young man who was madly in love committed the murder.

follow google news

Latest Crime News : प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने एका तरुणाची गोळ्या हत्या केलीये. गर्फफ्रेंडच्या बहिणीला एक तरुण त्रास देत होता. त्यामुळे संतापलेल्या प्रेमावीराने त्याला गोळ्या घातल्या. पण, गोळ्या घातल्यानंतर कळलं की, ज्याची हत्या केली, तो पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये ही घटना घडलीये. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव सफदर असं आहे.

निवृत्त इन्स्पेक्टरच्या मुलाची हत्या

ही घटना घडली गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत. सुरौली गावात राहणारा सफदर इमाम याची 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बारूई गावात असलेल्या आंबेडकर पार्कजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

वाचा >> Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!

एसपी सोमेन वर्मा यांनी गोसाईगंज पोलिसांसह SWAT टीमला हत्येच्या तपास करण्याचे आदेश दिले. SWAT टीम आणि गोसाईगंज पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी जसपारा येथील रहिवासी नीरज सिंग उर्फ भोलू, बारूई येथील राज सिंग उर्फ राजा सिंग, जसपारा येथील पंकज कुमार यांना अटक केली. या आरोपींनी त्याची हत्या केल्याचे तपासातून समोर आलंय.

प्रेमात प्रियकर झाला खुनी

आरोपींकडून खुनात वापरलेले पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मिस काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एसपी म्हणाले की, गोसाईगंज कादीपूर रोडवर असलेल्या जसपारा वळणावरून मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

वाचा >> भयंकर! 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोळ्यात किडा घुसला, ऑपरेशननंतर डॉक्टरही चक्रावले

अटक करण्यात आलेल्या आरोपी नीरज सिंहने सांगितले की, त्याचे शेजारील बारूई गावात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. तिला एक लहान बहीण आहे. तिला तो बोलण्यासाठी आग्रह करायचा. त्यासाठी सफदर इमाम हा त्याचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहायचा आणि तो सतत तिच्या मागे टाकायचा. ज्याची तक्रार तिने मोठ्या बहिणीकडे म्हणजेच नीरजच्या गर्लफ्रेंडकडे केली होती.

सफदरच्या डोक्यात घातली गोळी

ही गोष्ट गर्लफ्रेंडने नीरजला सांगितली. नीरजने सफदर इमामला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. मग त्याने 20 ऑगस्ट रोजी सफदर काही कामानिमित्त नीरजच्या गावी जसपारा येथे आला होता. नियोजनाचा एक भाग म्हणून नीरजने राज सिंह, राजन कुमार आणि पंकज यांना सोबत घेऊन आंबेडकर पार्कमध्ये गेले.

वाचा >> Supriya Sule : ‘118 जागा लढल्यावर…’, दिलीप वळसे पाटलांवर सुळेंचा पलटवार

आंबेडकर पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बारूई गावाकडे जाणाऱ्या पक्क्या रस्त्यावर चार आरोपी उभे होते. सफदर येताना पाहून या लोकांनी त्याला थांबवले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सफदर इमामने दुचाकीवरून खाली उतरून नीरज आणि राज यांना चापट मारली.

त्यानंतर नीरजने पिस्तूल काढून त्याच्यावर गोळीबार केला. सफदरच्या डोक्यात गोळी लागली आणि तो रस्त्याच्या कडेला पडला. हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांना नंतर अटक करण्यात आली.

    follow whatsapp