Beed Crime News : गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारीची मालिक कायम सुरू आहे. 111 दिवसांपूर्वी झालेली संतोष देशमुख यांची हत्या, त्यानंतर उघड झालेले वाल्मिक कराडचे प्रताप, खोक्याची मारहाण आणि अनेक बंद झालेल्या फाईल्स. गुन्हेगारीच्या या घटना पाहून राज्य हादरलं. पोलीस प्रशासनात अनेक बदल झाले, नवे पालकमंत्री आले, मात्र गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. अशातच आता शिरसाळा जवळ कान्हापूर गावात युवकाची हत्या, जुन्या वादातून हत्या झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray : छावा सिनेमाचा फिव्हर ते औरंगजेबाची कबर, राज ठाकरे यांनी 'तो' नरेटीव्ह हाणून पाडला?
धारूर तालुक्यातील कान्हापूर या गावात ही घटना घडली. दगडाने ठेचून स्वप्निल उर्फ बबलू देशमुख या तरूणाचा खून करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख याने मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच मृत अविनाश देशमुख यांच्या भावाने ही हत्या केल्याची माहिती आहे.
काय होता जुना वाद?
अविनाश देशमुख नावाच्या व्यक्तिने मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळूनगच ही आत्महत्या केली होती. याप्रकरणी बबलू देशमुख यांच्यावर 306,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. हाच गुन्हा मागे घेण्यासाठीच संतोष देशमुख यांच्यावर स्वप्नील उर्फ बबलू देशमुख कडून वारंवार दबाव आणला जात होता.
स्वप्निल उर्फ बबलू देशमुख वारंवार या कुटुंबियांना धमकात होता आणि याच रागातून अविनाश देशमुख याचे भाऊ संतोष देशमुख व भाऊजाई सोनाली देशमुख व इतर आरोपींनी स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची धारदार शस्त्राने हत्या केली.
आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले
स्वप्निल आणि देशमुख कुटुंबामध्ये झालेल्या झटापटीमध्ये या हल्ल्यात संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पाठीवर वार असल्याची माहिती आहे. घटनास्थळावरून गुप्ती जप्त करण्यात आली आहे. घटना होताच आरोपी संतोष देशमुख व त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. या दाम्पत्या विरोधात फिर्याद दाखल केली.
जिथे भावाने गळफास घेतला, तिथेच हत्या
संतोष देशमुख व सोनाली देशमुख हे आत्महत्या केलेल्या अविनाश देशमुख यांचे भाऊ व भावजय आहेत. विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली हा स्वप्निल देखशमुखची हत्या झाली. या संपूर्ण घटनाक्रमामुळे गावात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा >> 'कबर ठेवा.. जगाला दाखवा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला इथे गाडला', औरंगजेबाची कबर आणि राज ठाकरेंचं सडेतोड भाषण!
दरम्यान, याप्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का? पोलिसांचा धाक या लोकांना आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT
