नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव या जोडप्याच्या नोएडा येथील घरावर छापा टाकला. दोघांवरही मॉडेल्ससोबत त्यांच्या घरी अडल्ट व्हिडिओ शूट केल्याचा करून ते आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफिक साइट्स चालवणाऱ्या कंपनीला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ज्यामधून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
ADVERTISEMENT
उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी Subdigi Ventures Private Limited नावाची कंपनी स्थापन केली आणि त्याद्वारे त्यांनी हा अवैध धंदा सुरू केला होता. असा आरोप आहे की, दोघांनीही त्यांच्या घरात पॉर्न व्हिडिओ शूट केले आणि ते सायप्रसमधील Technius Limited नावाच्या कंपनीला शेअर केले. ईडीच्या मते, Technius Limited ही Xhamster आणि Stripchat सारख्या पॉर्न वेबसाइट्सची ऑपरेटर आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूने देसी पॉर्न बनवून कसे कमवले पैसे? पाहा कसं आहे त्यांचं संपूर्ण मॉडेल
"जाहिरात, मार्केट रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण यासारख्या सेवांच्या स्वरूपात Subdigi Ventures आणि त्यांच्या संचालकांच्या खात्यांमध्ये परदेशी पैसे नियमितपणे येत होते," असे ईडीने म्हटले आहे. तथापि, हे पैसे Xhamster वर स्ट्रीम केलेल्या अडल्ट व्हिडिओमधून मिळालेले असल्याचे मानले जात आहे. ईडी सूत्रांचे म्हणणे आहे की, हे FEMA चे उल्लंघन आहे. कारण हा पैसा अडल्ट कंटेंट सेवेसाठी दिले जात होते, जे भारतात बेकायदेशीर आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलू 'या' वेबसाइट्ससाठी घरातच बनवायचे पॉर्न, मॉडेल्सला द्यायचे 'एवढी' रक्कम!
उज्ज्वल आणि नीलू यांना कुठून मिळायच्या मुली?
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर फसवत असे. जाहिरातींद्वारे मॉडेल्सची भरती केली जात होती आणि त्यांना मोठ्या कमाईच्या आमिषाने पॉर्न व्यवसायात ढकलले जात होते. अडल्ट व्हिडिओंमधून मिळणाऱ्या कमाईपैकी 25% रक्कम मॉडेल्सना देण्यात यायची.
तपासात असे दिसून आले की, वरील कंपनी आणि तिच्या संचालकांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 15.66 कोटी रुपये बेकायदेशीरपणे पाठवण्यात आले होते, तसेच नेदरलँड्समधील एका "अघोषित" बँक खात्यात टेक्निअस लिमिटेडने सुमारे 7 कोटी रुपये हस्तांतरित केले होते. परदेशी बँक खात्यात मिळालेले क्रेडिट आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे भारतात रोखीने काढले जात होते.
ADVERTISEMENT
