Lok Sabha : ''हिंमत असेल तर एक...'', भाजपाचं राऊतांना थेट आव्हान

योगेश पांडे

26 May 2024 (अपडेटेड: 26 May 2024, 08:39 PM)

Chandrashekhar Bawankule challenge to sanjay raut : नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपावर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

chandrashekhar bawankule challenge to sanjay raut on saamna rokhthok pm narendra modi amit shah devendra fadnavis

संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत.

follow google news

Chandrashekhar Bawankule challenge to sanjay raut : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या (Sanjay Raut) या आरोपावर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  (chandrashekhar bawankule challenge to sanjay raut on saamna rokhthok pm narendra modi amit shah devendra fadnavis) 

हे वाचलं का?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट लिहून संजय राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. बावनकुळे नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊयात. 

बावनकुळेंची एक्स पोस्ट जशीच्या तशी...

उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?

हे ही वाचा : 'मंत्र्यांनी कार्यालयात बोलावून दबाव आणला, अधिकाऱ्याने शिंदेंवर टाकला लेटर बॉम्ब

आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार. 

2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या!, असे आव्हान बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिले. 

राऊतांच्या लेखात काय? 

संजय राऊत यांनी 'सामना'मधील रोखठोक सदरामध्ये लिहले की,  "4 जूननंतर भाजपात मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरी यांच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात."

हे ही वाचा : "गडकरींच्या पराभवासाठी मोदी,शाह, फडणवीसांनी प्रयत्न केले, पण..."

राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, "जे गडकरी यांचे तेच योगींचे. अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शाहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल."

    follow whatsapp