Khuni Ganpati : धुळ्यातील मानाच्या गणरायाला 'खुनी गणपती' नाव कसं पडलं? काय आहे इतिहास?

मुंबई तक

07 Sep 2024 (अपडेटेड: 07 Sep 2024, 04:21 PM)

Dhule Khuni Ganpati History : 1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटीशांनी गोळीबार केला.

dhule khuni ganpati history symbol of hindu muslim unity know the history khuni ganpati mandir ganesh chaturthi 2024

हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक असलेला "खुनी गणपती"

follow google news

बातम्या हायलाइट

point

हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक असलेला धुळ्यातील "खुनी गणपती"

point

'खुनी' नावामागची आहे रंजक कहाणी

point

मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन

Dhule Khuni Ganpati History : महाराष्ट्रासह देशभरात वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं आहे.त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात बाप्पा विराजमान झाले आहेत. आता दहा दिवसांचा पाहूणचार घेऊन बाप्पा परतीच्या प्रवासात निघणार आहेत. तत्पुर्वी धुळ्यातल्या एका खुनी गणपतीची खुप चर्चा आहे. आता हे नाव वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे...! धुळ्यातील खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय आहे? तो जाणून घेऊयात. (dhule khuni ganpati history symbol of hindu muslim unity know the history khuni ganpati mandir ganesh chaturthi 2024) 

हे वाचलं का?

1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्यानं ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले,अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने तब्बल 5 दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, सरकारने घेतला 'हा' निर्णय

पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.

दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होत, बरोबर सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच नमाजची अजान होतांना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते, मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो, तिथूनच आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते.एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते. तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. याठीकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविक सांगतात. हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मीयांनी ती आजतागायत जपलीय. 

हे ही वाचा : Gold Price: बाप्पाच पावला! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कोसळले; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...

आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहित नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामूळे या इतिहास आणि वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून वाचलाय.  जसं 1895-1896 मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की खुनी मशिद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तस जुन्या धुळ्याने हिंदूबहूल कॉलनीतली / पेठेतली लोकांनी मशिद पावित्र्याने जपलीय, अशी माहिती मंडळाचे कार्यकारी सदस्य सुवालाल फुलपगारे यांनी दिली आहे. 

    follow whatsapp