Pooja Khedkar Case Update : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारने (central govenment) मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना आयएएस सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. बोगस प्रमाणपत्र सादर करून आयएएस बनलेल्या पूजा खेडकर या वादात सापडल्या होत्या.त्यानंतर त्यांचे आई वडील देखील वादात सापडले होते. आता केंद्र सरकारने त्यांना नोकरीवरून काढून टाकल आहे.त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. (pooja khedkar dismissed from ias service upsc central government action)
ADVERTISEMENT
पूजा खेडकर या युपीएससीतील निवडीमुळे वादात सापडल्या होत्या. UPSC CSE-2022 परीक्षेत बसण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती आणि अपंगत्व याबाबत चुकीची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यूपीएससीने त्यांना अपात्र घोषित केले आहे. आता केंद्र सरकारने त्यांना आयएएस सेवेतून तत्काळ बडतर्फ केले आहे.
हे ही वाचा : Puja Khedkar : पूजा खेडकरची IAS नोकरी गेली! यूपीएससीचा सर्वात मोठा दणका
दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरण
पूजा खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पूजा खेडकर यांनी त्यांच्या याचिकेत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील तिच्या 12 पैकी 7 प्रयत्नांकडे दुर्लक्ष करण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. आपल्या गुडघ्यात समस्या असल्याचा दावा खेडकर यांनी केला. त्यामुळे त्याला 'दिव्यांग' श्रेणीतच संधी मिळायला हवी होती. 47% अपंगत्व असूनही ती सर्वसाधारण श्रेणीत परीक्षेला बसली होती, असा युक्तिवादही तिने केला होता. नागरी सेवा परीक्षेसाठी अपंगत्व बेंचमार्क 40% आहे.
दिल्ली पोलिसांनी हे आरोप केले आहेत
पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजीच दिल्ली उच्च न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल केला होता. या अहवालात दिल्ली पोलिसांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितले. 2022 आणि 2023 च्या नागरी परीक्षेदरम्यान देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या प्रमाणपत्रात पूजा खेडकरनेही आपले नाव बदलले आहे.
हे ही वाचा : Pooja Khedkar Father : दोन वेळा निलंबन अन् लाखोंची...; पूजा खेडकरांच्या वडिलांचे 'कारनामे'
महाराष्ट्रातून हे बनावट प्रमाणपत्र बनवले जात असल्याचा दावाही खोटा असल्याचे पोलिसांनी आपल्या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2022 आणि 2024 मध्ये अहमदनगर महाराष्ट्रातून दोन प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले, परंतु पोलिसांनी या प्रमाणपत्रांची माहिती वैद्यकीय प्राधिकरणाकडे मागितली असता, त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT