Chhagan Bhujbal : "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?

मुंबई तक

19 May 2024 (अपडेटेड: 19 May 2024, 05:30 PM)

Chhagan Bhujbal Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना एक मोठा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले मोठे विधान.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ.

follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांचा मोठा खुलासा

point

शरद पवारांच्या विधानावर भुजबळ काय बोलले?

point

2004 मध्ये काय घडलं होतं?

Chhagan Bhujbal on Sharad Pawar Statement : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी इतिहासातील राजकीय घडामोडींबद्दल बोलताना एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. 'भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं, तर पक्ष फुटला असता', असं विधान शरद पवारांनी केलं. त्याला उत्तर देताना भुजबळांनी वेगळीच स्टोरी सांगितली. वाचा नेमकं भुजबळ काय म्हणाले? (Chhagan Bhujbal said that Congress had offered me the post of Chief Minister of Maharashtra)

हे वाचलं का?

'२००४ मध्ये आमच्या सर्वात जास्त जागा आल्या. मात्र, अजित पवार नवखे होते, त्यांना मुख्यमंत्री करता येत नव्हतं. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर भविष्यात पक्ष फुटला असता', असं विधान शरद पवार यांनी लोकसत्ता वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले. 

शरद पवारांच्या विधानावर भुजबळ काय म्हणाले?

याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'मी पण ते वाचलं आहे. मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. ज्यावेळी १९९५ मध्ये आमचं सरकार गेलं. शरद पवारांनीच मला विधान परिषद आमदार केलं आणि नंतर विरोधी पक्षनेता केलं."

"त्यावेळच्या पाच वर्षांच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधात जे काम केलं, ते इतकं की माझ्या घरावर हल्ला झाला होता. जीवघेण्या हल्ल्यातून मी वाचलो होतो. त्यावेळी सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो."

हेही वाचा >> पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?

"मी आणि शरद पवार साहेब त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी जर पक्ष फुटला नसता, तर माझी खात्री आहे... शंभर टक्के मुख्यमंत्री मीच झालो असतो. पण, एवढंच नाही. शरद पवारांना काँग्रेसमधून बाहेर काढलं. पक्ष त्यावेळी फुटला. त्यावेळी सुद्धा मी पवारांसोबत न जाता काँग्रेसमध्येच थांबावं. काँग्रेस तुम्हाला पुढच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आताच घोषित करतो. असे मेसेज, फोन माधवराव शिंदे, शीला दीक्षित ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, मुकुल वासनिक, कलमाडी यांच्याकडून होते."

 

chhagan Bhujbal : 'दिल्लीला या मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो'

भुजबळ पुढे म्हणाले की, "संजय खोडके यांना विचारलं, तर ते तुम्हाला सांगतील की हे खरं आहे की नाही. ते म्हणाले की, तुम्ही फक्त दिल्लीला या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. पण, मी सांगितलं की, पवारांसोबत राहणार. नंतर मी प्रदेशाध्यक्ष झालो. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मग ती निवडणूक सहा महिने आधी झाली. त्यावेळी जरी आमच्या जागा जास्त आल्या असत्या, तर मी मुख्यमंत्री झालो असतो. पण, त्यावेळी काँग्रेसचे जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली. आम्ही वेगळे लढलो. शिवसेना-भाजप एकत्र होते."

हेही वाचा >> "मला संध्याकाळीच पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असता" 

"२००४ ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता. याची मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळी सुद्धा शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. पवार साहेबांसोबत मी आलेलो मी पहिला होतो. इतर मंडळी आपापल्या मतदारसंघात मतदान घेत होती. काँग्रेसमध्ये राहायचं की, शरद पवारांसोबत जायचं. का पक्ष फुटला असता, हे त्यांचं मत आहे. मला काही कल्पना नाहीये. त्यानंतर सुद्धा त्यांनी एक-दोन वेळा मला उपमुख्यमंत्रीपद दिले. पक्ष काही फुटला नाही. आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला. ही परिस्थिती आहे", असा राजकीय घटनाक्रम भुजबळ यांनी सांगितला. 

    follow whatsapp