शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा

Solapur News: 68 वर्षीय व्यक्तीविरुद्ध जेल रोड पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

11 Apr 2025 (अपडेटेड: 11 Apr 2025, 02:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापुरातील धक्कादाय प्रकार, पालकांमध्ये संताप

point

68 वर्षाच्या वृद्धावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Solapur News : सोलापूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातल्या एका एका व्यक्तिने शाळेतल्या लहान मुलींसमोर विचित्र चाळे केल्याचा प्रकार घडलाय. शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलींसमोर अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच पगार, MSRTC मध्ये नेमकं काय घडतंय, नेमकं प्रकरण काय?

68 वर्षीय व्यक्तीविरुद्ध जेल रोड पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपीचं नाव यल्लापा कुंचिकोर्वे असल्याचं सांगण्यात येतंय.

आरोपीने हा प्रकार 7 एप्रिलरोजी केल्याचं कळतंय. या वृद्धानं कुठलीही लाज न बाळगता, घरासमोर असलेल्या मुलींना आपल्या जवळ बोलावलं. त्यानंतर त्यांना पैसे देण्याचं आमिष दाखवलं आणि अश्लील कृत्य केले असा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार कळल्यानंतर मुली घाबरल्या. त्यांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरुन पोलिसात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा >> सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून! पतीला म्हणाली, तुम्ही 20 वर्षांपासून मला...

पोलिस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले की, तीन मुलींसोबत जे घडलं ते अत्यंत चुकीचं होतं. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही 48 तासांच्या आत तपास पूर्ण करू. पोलिस तसंच आम्ही आरोपपत्र दाखल करण्याचा आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.


    follow whatsapp