Chitra wagh vs Shiv Sena UBT : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात महाराष्ट्रात पॉर्नस्टारवरून ठाकरे-भाजपमध्ये मोठा वाद पेटला आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. त्यात आता त्यांना पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रूजवायची आहे का? असा खडा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी करत ठाकरेंवर (Shiv Sena UBT) गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने प्रज्वल रेवण्णावर बोलावं असं आव्हान आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) दिले आहे. त्यामुळे पॉर्नस्टारवरून भाजप ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. (chitra wagh vs shiv sena ubt lok sabha election campaign advertising aditya thackeray sushma andhare priyanka chaturvedi)
ADVERTISEMENT
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उबीटीच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. अदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीमध्ये दाखण्यात आलेलं एक पात्र हा पॉर्नस्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलीसोबत अश्लील चित्रीकरण करतो. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे. त्यांचे उल्लू अॅपमधील एका वेबसीरीजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी महिला अत्याचाराची जाहिरात कशी केली? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एक पॉर्न स्टार ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का? असाही प्रश्न त्यांनी केला होता.
हे ही वाचा : 'शिंदेंचं-ठाकरेंसोबत साटंलोटं, मुलासाठी ठाणे...', BJP पदाधिकाऱ्याचा आरोप
त्यामुळे आता ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाची, त्याचा आणि या पॉर्नस्टारचा काय संबंध आहे? या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.
चित्रा वाघ यांच्या या आरोपावर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने आता प्रज्वल रेवण्णावर बोलावं. भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्याने येऊन त्याचा प्रचार केला. असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपमधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंनी सु्द्धा चित्रा वाघ यांच्या टीकेचा समाचार घेतला. भाजपच्या आक्रस्ताळेबाईंनी घाईघाईत दिशाभूल करणारी माहिती दिली. कलाकार वेगवेगळ्या भूमिका करतो. कलाकारांच्या भूमिकेवर त्या बोलणार असतील तर, नवनीत राणा आणि कंगणा रणौतच्या भुमिकांवर त्या काय बोलणार? त्यांचीही अत्यंत वाईट दृष्य आहेत. प्रज्वल्ल रेवण्णाचे तीन हजार पेक्षा जास्त व्हिडिओ बाहेर आलेत.त्यावर त्या काय बोलणार आहेत? असा सवाल सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना केला आहे.
हे ही वाचा : ''ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर''
जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला आहे.ज्याने हजारो महिलांच शोषण केलं. घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तु्म्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आलेत. तो व्यक्ती भाजपासोबत येऊन लोकसभेची लढाई लढत आहे. त्याला पळवून लावण्याच काम तुम्ही केलं. तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.
ADVERTISEMENT