Lok Sabha : गजानन कीर्तिकरांवर कारवाई होणार? CM शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

23 May 2024 (अपडेटेड: 23 May 2024, 07:08 PM)

Cm Eknath shinde : "गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, आता बस्स", असा संताप व्यक्त करत शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

cm eknath shinde reaction on gajanan kirtikar amol kirtikar lok sabha election 2024 shishir shinde

मुख्यमंत्री शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्या विधानावर भाष्य केले होते.

follow google news

Eknath Shinde Reaction on Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी 'अमोल ना नगरसेवक, ना आमदार... तर आता डायरेक्ट खासदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर हकालपट्टी केल्याची मागणी केली होती.  या सर्व घडामोडींवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली होती. (cm eknath shinde reaction on gajanan kirtikar amol kirtikar lok sabha election 2024 shishir shinde) 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्या विधानावर भाष्य केले होते. 'कीर्तिकरांनी माझ्याशी संपर्क केला होता. त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतर याबाबत पुढे काय निर्णय घ्यायचा, तो निर्णय पक्ष ठरवेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Ravindra dhangekar : "या 'डिल'मध्ये पोलीस आयुक्तही सहभागी", धंगेकरांची फडणवीसांकडे मोठी मागणी

गजानन कीर्तिकर काय म्हणाले होते? 

"अमोलला मी बोट धरून शिवसेनेत आणले, पण पक्षामध्ये, राजकारणामध्ये त्याला जी संधी मिळायला हवी होती, त्याला मिळाली नाही. पण, सुदैवाने आता त्याला ती संधी मिळाली आहे. अमोल ना नगरसेवक, ना आमदार... तर आता डायरेक्ट खासदार होणार आहे. खासदारकीची निवडणूक लढवतोय म्हणजे निवडून आल्यावर अमोल खासदारच होणार ना", असे गजानन कीर्तिकर म्हणाले होते.

पक्षातून हकालपट्टीची मागणी

 "गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, आता बस्स", असा संताप व्यक्त करत शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : 'देवेंद्रजी, महाराष्ट्राला 'या' प्रश्नाचं उत्तर द्या', सुप्रिया सुळेंनी पकडलं खिंडीत

ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीने तुमचा एकेरी उल्लेख करत जाणूनबुजून अपमान करत त्वेषाने प्रतिस्पर्धी उबाठाची बाजू घेतली. गजाभाऊ मूक साक्षीदार बनले होते.आज गजाभाऊ कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचे ओंगळवाणे राजकीय प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली. गजाभाऊ आपल्या पक्षातून बाहेर पडून मातोश्रीचे लाचार श्री व्हायचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकी शिशिर शिंदे यांनी कीर्तिकरांवर केली होती. 

    follow whatsapp