"तुझं पार्सल माघारी बीडला...", राम सातपुतेंना धैर्यशील मोहिते पाटलांचा थेट इशारा

मुंबई तक

14 Apr 2024 (अपडेटेड: 14 Apr 2024, 10:19 PM)

Dhairyashil Mohite Patil on Ram Satpute : राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाणार, असंच दिसतंय. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आमदार राम सातपुते यांना धैर्यशील पाटील यांनी थेट इशारा दिला आहे.

माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि धैर्यशील मोहिते पाटील.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर लोकसभा निवडणूक राम सातपुते यांना जाणार जड

point

धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुतेंना दिला इशारा

point

माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणूक होणार रंगतदार

Dhairyashil Mohite Patil on Ram Satpute : (नितीन शिंदे, अकलूज) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसचे आमदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना थेट इशारा दिला. पार्सल बीडला पाठवायचं, असे म्हणत धैर्यशील पाटलांनी सातपुतेंविरोधात दंड थोपटले आहेत. 

हे वाचलं का?

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी त्यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या परिसरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. 

धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंना इशारा काय?

यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटलांनी माळशिरसचे विद्यमान आमदार आणि सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेले राम सातपुते यांना नाव न घेता इशारा दिला. ते काय म्हणाले वाचा...

हेही वाचा >> भाजपला 14 ते 17 जागा; 'मविआ'ला किती? महायुतीला टेन्शन देणारा पोल

भाषणाचा शेवट करताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, "फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे. एका माणसाला (राम सातपुते यांचा उल्लेख टाळला)... आपण त्याला निवडून दिलंय इथून. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. मांडव्यात म्हणाला 70-75 वर्षात काय विकास झाला, तो मी फक्त अडीच वर्षात केला."

"तुझं पार्सल बीडला पाठवायचं आहे आम्हाला"

"मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या (विजयसिंह मोहिते पाटील) सांगण्यावरून इथे जेवढी बसलीत ना, त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आणि तुला एका रात्रीत... तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचं आहे आम्हाला", असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना पराभूत करण्याचा निर्धार समर्थकांसमोर बोलून दाखवला आहे. त्यामुळे माढ्याबरोबर सोलापूरची लढत रंगतदार होणार आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सातपुते कसे झाले आमदार?

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाचे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर पूर्वीपासून वर्चस्व राहिलेले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील हे सहा वेळा आमदार राहिलेले आहेत.

हेही वाचा >> शरद पवारांनी मोदींची पुतीन यांच्याशी का केली तुलना? 

हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर 2019 मध्ये राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. पण, त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबतच वैर घेतल्याने आता त्यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवण्याचा मार्ग खडतर झाला आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

 

    follow whatsapp