Sanjay Raut on Corruption: सांगली: 'वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं.. हे वाटल्यास त्यांनी त्यांचे वसुली रॅकेटचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं..' असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (lok sabha election 2024 ask kirit somaiya how big is collection racket in bjp sanjay raut said in a press conference in sangli)
ADVERTISEMENT
'आमच्यामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जे वसुली रॅकेट चालवत होते. ते सगळे वसुली रॅकेटर्स भाजपने आपल्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलं आहे.' असे आरोप करत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार देखील गंभीर आरोप केले. पण हे आरोप करताना संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नाव का घेतलं? हे आपण जाणून घेऊया.
सगळ्यात आधी संजय राऊत नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया..
'सगळे आमच्यातील वसुलीवाले लोकं भाजपने त्यांच्यात घेतले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्यामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जे वसुली रॅकेट चालवत होते. ते सगळे वसुली रॅकेटर्स भाजपने आपल्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.. आमचा पक्ष स्वच्छ झाला. देशभरातील सर्व रॅकेटर्स.. ईडी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोकं आहेत. 8 हजार कोटी जे भाजपकडे जमा झाले ते या वसुलीतून जमा झाले.'
हे ही वाचा>> Nitin Gadkari : 'मुनगंटीवारांना शिलाजीत देऊ, काम जोरात होईल; विकासाचं काम..'
'देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज आहे.. नागपूरमध्ये उपचार होत नसेल तर मुंबई किंवा ठाण्यात उपचार करू.. हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं.. हे वाटल्यास त्यांनी त्यांचे वसुली रॅकेटचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं..' असं संजय राऊत सांगलीतील पत्रकार परिषदेत म्हणाले.
मात्र, संजय राऊत असं का म्हणाले याची नेमकी पार्श्वभूमी काय होती.. हे आता आपण जाणून घेऊया.
मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराबाबत मोठं विधान केलेलं. ते म्हणालेले की, 'मी गेले दोन वर्ष पाहिलं की, या सरकारमध्ये पण गोंधळ घालायचे प्रयत्न झाले, झाले प्रयत्न.. नवीन सरकारमध्ये.. व्यक्ती-व्यक्ती असतो. तो तिथला असो किंवा इकडचा असो.. मी तर एकदा दिल्लीत जाऊन सांगितलं की, पहिले एक मंत्री घोटाळा करायचा तो एकट्याने करायचा. आता त्याने काय केलं की, तसाच घोटाळा करण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये केला.. भाजपला पार्टनर केलं..'
'मी म्हटलं.. हे मी नाही चालवून घेणार, मला हे मान्य नाही. मी इथेही सांगितलं.. ज्यांना सांगायचं होतं त्यांना.. शेवटी ते टेंडर रद्द झालं. म्हणून प्रयत्न इथेही होत असतात. मात्र, फरक आहे.. इथे त्यांना नियंत्रणात आणता येतंय.'
हे ही वाचा>> 'जनावरही सांगेल हा जिल्हा...', कदमांनी राऊतांना डिवचलं!
'दुसरीकडे गोष्ट म्हणजे इथे खुन्नस नाही.. सुपारी मुख्यमंत्री कार्यालयाने घ्यायची आणि पोलिसांना द्यायची ही स्थिती या सरकारमध्ये नाही. मला अजूनही पूर्ण विश्वास आहे की, नोव्हेंबर 2024 मध्ये जे सरकार येणार त्यामध्ये या सरकारपेक्षा अधिक चांगले बदल झालेले असतील.'
'शेवटी जे 33 महिने चालू होतं ते पुढे चालू राहिलं असतं तर किरीट सोमय्या हिरो असता. पण महाराष्ट्राची वाट लागलीअसती. म्हणून समझोता केलाय..' असं मोठं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं.
किरीट सोमय्यांच्या या विधानामुळे विरोधक आता भाजपलाच घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT