14 December 2024 Gold Rate: जबरदस्त! सोन्याच्या भावात मोठी घसरण; मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर वाचा एका क्लिकवर

मुंबई तक

• 01:59 PM • 14 Dec 2024

Gold Rate In India : जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली घसरण?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

point

आजचे सोनं-चांदीचे भाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Gold Rate In India : जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

आज  22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव

आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हे ही वाचा >>  Allu Arjun Released : तुरूंगाबाहेर येताच अल्लू अर्जुन म्हणाला ज्या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झाला, त्यांना...

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78870 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपये झाली आहे. 

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79020 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72450 रुपये झाली आहे. 

हे ही वाचा >>  PAN 2.0 : नव्या जमन्याचं नवं पॅनकार्ड, QR कोडचा काय उपयोग होणार? घरबसल्या कसा कराल अर्ज?

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78870 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपये झाली आहे. 

चेन्नई 

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78870 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपये झाली आहे. 

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78920 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72350 रुपये झाली आहे. 

    follow whatsapp