EVM ठेवलेल्या रुमचे CCTV बंद पडले... बारामतीत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

14 May 2024 (अपडेटेड: 14 May 2024, 09:30 PM)

Baramati CCTV EVM: बारामतीत EVM असलेल्या रुमचे सीसीटीव्ही तासभर बंद असल्याने या प्रकरणी आता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याचबाबत युगेंद्र पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbaitak
follow google news

Yugendra Pawar on Baramati CCTV EVM: बारामती: बारामतीतील ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या होत्या. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, 'ही खूप गंभीर गोष्ट आहे. अगोदरच ईव्हीएम बाबत लोक शंका करत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने आणि त्यांच्या यंत्रणेने अधिकची काळजी घेतली पाहिजे होती. एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, हे खूप गंभीर व चुकीचे आहे.' अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. (lok sabha election 2024 cctv of the evm room went off what exactly happened in baramati)

हे वाचलं का?

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पाडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज शरदचंद्र पवार पक्ष कार्याला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

बारामतीत नेमकं काय घडलं?

बारामती लोकसभा मतदारसंघाच मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे हे काल अचानक बंद झाले होते. तब्बल तासभर हे सीसीटीव्ही बंद होते. ज्याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला होता. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काही तरी काळं-बेरं होण्याची भीती व्यक्त केली होती.

हे ही वाचा>> PM Modi: ...अन् पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले!

युगेंद्र पवार राजकारणात उतरणार का?

राजकारणात उतरणार का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण अनेकदा हा प्रश्न केला आहे. मीही अनेकदा नाही असं सांगितलं आहे. जर पवार साहेबांचे संकेत आले तर.. आपण राजकारणात याल का असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. 

निवडणुकीनंतर माझ्या कुटुंबातील सदस्य परदेशी दौऱ्यावर जातील. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले की, मी बारामतीतच आहे. आणि इतरांनाही कुणाला परदेशात जायचं असेल तर.. त्यात गैर आणि चुकीचं काही नाही. अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.

हे ही वाचा>> भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरले, पण भुजबळांनी केली 'सुटका'

प्रचारादरम्यान नागरिकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, नोकरी संदर्भातील कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाविषयी विचारले असता ते म्हणाले की, वैद्यकीय मदत कक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे. मदत कक्ष सुरू केल्यापासून २० लाखापर्यंतची आतापर्यंत मदत केली आहे. नागरिकांच्या ज्या काही वैद्यकीय समस्या असतील त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

    follow whatsapp