Mahavikas Aaghadi Press Conference: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी फोनही करण्यात आले आहेत. महायुतीचे एकूण 39 आमदार आज फडणवीस सरकारमध्ये शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, महाविकास आघाडीने महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. दानवे फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले, या सरकारने आम्हाला चहापाण्याचं निमंत्रण दिलंच. पण असं हे खुनी सरकार, शेतकरीविरोधी सरकार, दलितांवर अत्याचार करणारं सरकार, दिवसाढवळ्या खून करणारं सरकार, या सरकारच्या चहापाण्याला आम्ही जाणं अशक्य आहे. म्हणून महाविकास आघाडीने या सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचं निर्णय आम्ही घेतला आहे.
ADVERTISEMENT
अंबादास दानवे पुढे म्हणाले, "या राज्यात हे सरकार आल्यापासून जवळपास 7 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे निघाले आहेत. अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या या कारभाराला विरोध करण्याचा निर्णय आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ईव्हीएमच्या आधारावर आलेलं हे सरकार आहे. मारकडवाडीसारख्या अनेक गावात, शहरात ईव्हीएमला विरोध होऊन या गावातील गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करणारं हे सरकार आहे".
हे ही वाचा >> Shiv Sena Minister List: शिंदेंनी 'या' नेत्यांना दिली संधी, पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!
सोयाबीन, कापूस, धान्याला भाव न देणारं हे सरकार आहे. दुधाचे भावही घसरले आहेत. सरकारने अधिकृतरित्या दर कमी केले आहेत. जुनं जाहीर झालेलं अनुदानही या सरकारने दिलं नाहीय. या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. बीडमध्ये सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या करणारं आहे सरकार आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा सहभाग आहे, असं हे सरकार मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत गुंतलं आहे. परंतु, या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष आहे की नाही, अशाप्रकारची स्थिती आहे, असंही दानवे म्हणाले.
हे ही वाचा >. 15 December 2024 Gold Rate: काय सांगता! मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे भाव पुन्हा गडगडले; 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त
राज्याच्या डोक्यावर जवळपास 8 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अशा या सरकारची अजूनही शपथविधी आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. या सरकारने ईव्हीएमच्या बळावर बहुमत कमावलं आहे. पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेले नाहीत. जे राज्य विकासाच्या दृष्टीकोनातून अकराव्या क्रमांकावर गेलं आहे. या राज्यातील अनेक उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेले आहेत. अशी स्थिती असतानाही या सरकारने या राज्याला कर्जबारीपणामध्ये ढकललं आहे. डिसेंबरमध्ये जे कर्ज घ्यायचं होतं, ते कर्ज या सरकारने आधीच उचललं आहे. आम्ही जनतेच्या हित्याच्या दृष्टीने येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी मोठी प्रतिकिया अंबादास दानवे यांनी मविआच्या पत्रकार परिषदेत दिली.
ADVERTISEMENT