Ajit Pawar:'पाहिजे तेवढा निधी देतो, पण कचाकच बटणं दाबा', हे काय बोलून गेले अजित पवार?

मुंबई तक

• 10:18 PM • 17 Apr 2024

Ajit Pawar Statement: जेवढा निधी लागेल तेवढा निधी देईन.. पण तुम्ही आम्हालात मत द्या.. असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर आता जोरदार टीका केली आहे.

अजित पवारांचं वादग्रस्त विधान

अजित पवारांचं वादग्रस्त विधान

follow google news

Ajit Pawar Baramati: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election)निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पवार वि. पवार अशी थेट लढाई पहिल्यांदाच होत आहे. विशेषत: अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत गेले. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक मंत्रिपदं मिळाली. पण आता लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष कसा कामगिरी करतं याकडे भाजपचं विशेष लक्ष असणार आहे. (lok sabha election 2024 i will give as much funds as needed but you vote for us controversial statement of ajit pawar)

हे वाचलं का?

यामुळे कोणत्याही परिस्थितीत बारामती आणि इतर जागांवर विजय मिळविण्यासाठी अजित पवार यांनी एका भाषणात निधी देण्याबाबत थेट विधान केलं आहे. जे आचारसंहितेच्या दृष्टीने वादग्रस्त असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.   

अजित पवारांचं वादग्रस्त विधान.. 

'निधीसाठी काय लागेल तो निधी द्यायला आम्ही सहकार्य करू.. पण पाहिजे तसा निधी.. तशी आमच्या मशीनमध्ये पण बटणं दाबा कचाकच.. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना.. नाहीतर माझा हात आखडता येईल..' असं थेट विधान अजित पवार यांनी एका व्यापारी मेळाव्यात बोलताना केलं आहे.

बारामतीचा विजय अजित पवारांसाठी महत्त्वाचा

महायुतीत अजित पवार यांच्या वाट्याला फारशा जागा आलेल्या नाहीत. पण बारामतीची जागा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीच जिंकावी यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. तसंच त्यावर देखील अजित पवारांचं बरचंस भवितव्य अवलंबून असणार आहे. 

यासाठीच अजित पवार हे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण असं करत असताना त्यांनी निधी देण्याबाबत जे विधान केलं आहे त्यावरू आता विरोधक हे त्यांना घेरत आहेत. त्यांचं विधान हे आचारसंहितेचं भंग करणारं आहे असा आरोप विरोधक करत आहेत. 

अजित पवारांवर संजय राऊतांची घणाघाती टीका

दरम्यान, अजित पवार यांनी जे विधान केलं त्यावरून शिवेसना (UBT) नेते संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. 'अजित पवार स्वत: ते एक व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केले आहेत त्यातील ते एक आहेत.' असं म्हणत राऊतांनी अजित पवारांसह भाजपवर देखील निशाणा साधला.

    follow whatsapp